उपनिबंधकाच्या रडारवर अवैध सावकारी !

By admin | Published: August 11, 2016 01:45 AM2016-08-11T01:45:04+5:302016-08-11T01:45:04+5:30

वाशिम जिल्ह्यात ११0 तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यातील एका प्रकरणात शेतक-याच्या बाजूने निर्णय घेण्यात आला.

Sub-registrar's radars are illegal! | उपनिबंधकाच्या रडारवर अवैध सावकारी !

उपनिबंधकाच्या रडारवर अवैध सावकारी !

Next

संतोष वानखडे
वाशिम, दि १0 : सावकाराने घर किंवा जमिन बळकाविल्याच्या तक्रारींचा ओघ जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे सुरू असून, एका प्रकरणात शेतकर्‍याच्या बाजूने निर्णय लागला आहे. सावकाराच्या ताब्यात असलेली जमिन मूळ मालक असलेल्या शेतकर्‍याला परत करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने दिले. या आदेशाची अंमलबजावणी होऊन ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संबंधित शेतकर्‍याचे नाव पुन्हा एकदा सात-बार्‍यावर आले आहे.
कर्जासाठी विविध प्रकारच्या राष्ट्रीयकृत बँका, ग्रामीण व जिल्हा मध्यवर्ती बँक तसेच सहकारी पतसंस्थांची पाळेमुळे घट्ट रोवलेली असतानादेखील खासगी सावकारीचा धंदा जिल्ह्यात तेजीत असल्याचे अवैध सावकारांविरोधातच्या तक्रारीने समोर आणले आहे. आतापर्यंंत जिल्हा उपनिबंधक कार्यालयांकडे सावकाराने घर किंवा जमीन बळकावल्याच्या ११0 तक्रारी आल्या असून, १0 प्रकरणांची सुनावणी सुरू आहे.
गत काही वर्षांंपासून निसर्गाची साथ मिळत नसल्याने शेतकरी विविध प्रकारच्या संकटात सापडले असल्याचे दिसून येते. कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे आणि शेती पिकविण्यासाठी शेतकरी पीककर्ज, बँकांचे कर्ज काढतो तर काही शेतकरी सावकारांकडून कर्ज घेतो. कर्जासाठी बँकांचे दर कमी आहेत. मात्र, प्रक्रिया किचकट असल्याने आणि सात-आठ चकरा मारल्यानंतरही पदरी निराशाच पडत असल्याने अनेकजण खासगी सावकारांकडे कर्जासाठी धाव घेतात. सावकार अधिकृत की अनधिकृत याचा विचार न करता कर्ज काढले जाते. तारण म्हणून सावकाराला जमिन किंवा मालमत्तेची खरेदी दिली जाते. खरेदीचा सर्व खर्च शेतकरी किंवा त्या ग्राहकाला पेलावा लागतो. कर्जाची परतफेड केल्यानंतर सावकाराने जमिन किंवा मालमत्तेची खरेदी पलटून देणे अपेक्षित आहे. मात्र, अनेक सावकार मालमत्ता पलटून देत नसल्याने पर्यायाने शेतकरी किंवा ग्राहकाला न्यायासाठी उपनिबंधक कार्यालयात धाव घ्यावी लागते. वाशिम जिल्हा उपनिबंधक कार्यालयात अवैध सावकाराने जमिन व मालमत्ता हडपल्यासंदर्भात एकूण ११0 तक्रारी आल्या आहेत. या तक्रारीत कितपत तथ्य आहे, याची पडताळणी करण्यासाठी सुरूवातीला तालुका उपनिबंधक कार्यालयाकडून संपूर्ण अहवाल बोलविला जातो. नंतर जिल्हा उपनिबंधक कार्यालयात जिल्हा उपनिबंधक याप्रकरणी सुनावणी घेतात. मंगरुळपीर तालुक्यातील पिंप्री बु. येथील पांडुरंग अमृता ठाकरे यांनीदेखील सावकाराने जमिन हडपल्याची तक्रार नोंदविली होती. याप्रकरणी तक्रारदार व गैरहजर यांची सुनावणी झाली.

Web Title: Sub-registrar's radars are illegal!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.