सुभाष ठाकरे यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 02:00 PM2019-01-11T14:00:12+5:302019-01-11T14:00:43+5:30
मंगरुळपीर : महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री महानायक स्व.वसंतरावजी नाईक यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा या मागणीसाठी माजी राज्यमंत्री सुभाषराव ठाकरे यांनी १ लाख स्वाक्षरी अभियान सुरु केले आहे. या अभियानाची माहिती ९ जानेवारी रोजी त्यांनी महामहिम राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना दिल्ली येथे भेट घेऊन दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क

महाराष्ट्राच्या विकासात स्व.वसंतराव नाईक यांचे मोलाचे योगदान असून त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी स्व. नाईक यांना भारतरत्न मिळावा म्हणून माजी राज्यमंत्री सुभाषराव ठाकरे यांनी स्वाक्षरी अभियान सुरु केले आहे. या अभियानांतर्गत गावोगावी जाऊन स्वाक्षºया घेण्यात येत आहेत. यासंदर्भात ठाकरे यांनी ९ जानेवारी रोजी दिल्ली येथे राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेऊन एक लाख स्वाक्षरी अभियानाची माहिती दिली. तसेच सदर अभियान २२ जानेवारीपर्यंत राबविण्यात येणार असून त्यानंतर एक लाख स्वाक्षरीचे निवेदन प्रशासनातर्फे आपणाकडे पाठविण्यात येणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रपतींनी ३० मिनिटे वेळ देऊन स्वाक्षरी अभियानाबद्दल आनंद व्यक्त करून ठाकरे हे याबाबत सर्वोत्कृष्ट उपक्रम राबवीत असून हे नक्कीच यशस्वी होईल असे सांगत या कार्यासाठी पूर्णपणे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी खा.मधुकरराव कुकडे, जिल्हा परिषद सदस्य गजानन अमदाबादकर यांची उपस्थिती होती. तसेच ८ जानेवारी रोजी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिह यांची सुद्धा ठाकरे यांनी दिल्ली येथे भेट घेऊन याविषयी माहिती दिली.