यशने जिल्ह्याचा नावलाैकिक वाढविला : सुभाष राठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:37 AM2021-07-26T04:37:37+5:302021-07-26T04:37:37+5:30

आफ्रिका खंडातील किलीमांजारो हे सर्वोच्च शिखर सर करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सहकार क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या वाशिम अर्बन बँकेने यश ...

Success enhances district's reputation: Subhash Rathi | यशने जिल्ह्याचा नावलाैकिक वाढविला : सुभाष राठी

यशने जिल्ह्याचा नावलाैकिक वाढविला : सुभाष राठी

Next

आफ्रिका खंडातील किलीमांजारो हे सर्वोच्च शिखर सर करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सहकार क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या वाशिम अर्बन बँकेने यश इंगोले याला ३१ हजार रुपयांची आर्थिक मदत केली आहे. या रकमेचा धनादेश बँकेचे मानद अध्यक्ष सुभाष राठी, अध्यक्ष सुरेश लोध, मुख्य कार्यकारी अधिकारी गोपाल खंडेलवाल यांच्या हस्ते सोमवारी प्रदान करण्यात आली. यश इंगोले याला गिर्यारोहणाची आवड असून, हिमाचल प्रदेशातील मनाली येथील अटलबिहारी वाजपेयी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनरिंग अ‍ॅण्ड अलाइड‌्स स्पोर्ट या संस्थेतून गिर्यारोहणाचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. प्रशिक्षणादरम्यान त्याने १५ हजार फूट यशस्वी चढाई केली असून, अहमदनगर जिल्ह्यातील ५४०० फूट उंचीच्या कळसूबाई या महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखरावर दोन वेळा यशस्वी चढाई केलेली आहे. आफ्रिका खंडातील सर्वोच्च किलीमांजारो शिखरावर ९ ते १७ ऑगस्ट २०२१ या कालावधीत होणार्‍या गिर्यारोहण मोहिमेसाठी त्याची निवड म्हणजे जिल्ह्याकरिता अभिमानास्पद असून, यशने जिल्ह्याचा गौरव वाढविल्याचे प्रतिपादन वाशिम अर्बन बँकचे मानद अध्यक्ष सुभाष राठी यांनी केले आहे. यश इंगोले याचे वडील वाशिम अर्बन बँकेच्या अमरावती शाखेत शाखाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. याप्रसंगी बँकेच्या संचालिका शिला राठी, हरिष राठी, कर्मचारी प्रतिनिधी तेजराव वानखेडे, शाखा प्रबंधक राजेंद्र अग्रवाल, सामाजिक कार्यकर्ते नीलेश सोमाणी, वरिष्ठ अधिकारी लक्ष्मण घोडके, सचिन देशमुख आदींची उपस्थिती होती. (वा.प्र.)

Web Title: Success enhances district's reputation: Subhash Rathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.