सॉफ्ट टेनिस स्पर्धेत मांगुळ झनक येथील खेळाडूचे यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:42 AM2021-02-24T04:42:41+5:302021-02-24T04:42:41+5:30

जळगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे ही स्पर्धा महाराष्ट्र राज्य सॉफ्ट टेनिस संघटनेतर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली ...

Success of a player from Mangul Zhanak in soft tennis tournament | सॉफ्ट टेनिस स्पर्धेत मांगुळ झनक येथील खेळाडूचे यश

सॉफ्ट टेनिस स्पर्धेत मांगुळ झनक येथील खेळाडूचे यश

googlenewsNext

जळगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे ही स्पर्धा महाराष्ट्र राज्य सॉफ्ट टेनिस संघटनेतर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. पुण्यासह जळगाव, मुंबई, बुलडाणा, उस्मानाबाद, सातारा, औरंगाबाद, रत्नागिरी, रायगड, सोलापूर या १० जिल्ह्यातील संघ सहभागी झाले होते. त्यामध्ये पुणे संघाकडून मांगुळ झनक येथील इंजिनिअर अमोल जनार्दन दांदडे ह.मु. पुणे यांची मुलगी तथा रिसोड पंचायत समितीचे सदस्य भूषण विलासराव दांदडे यांची पुतणी अयाती अमोल दांदडे हिने सब ज्युनियर गटात व वरिष्ठ गटात रौप्यपदक मिळवत दोन पदकाची कमाई केली व ४ ते ८ मार्चदरम्यान जम्मू आणि काश्मीर येथे होणाऱ्या सिनियर राष्ट्रीय पातळीवर व २१-२७ मार्च या दरम्यान अहमदाबाद येथे होणाऱ्या सब ज्युनिअर राष्ट्रीय पातळीवर तिची निवड झाली आहे . त्यामुळे अयाती दांदडे व तिच्या सहकाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. स्पर्धेचे पारितोषिक वितरण महाराष्ट्र राज्य सॉफ्ट टेनिस संघटनेने अध्यक्ष सुनील पूर्णपाने, सहसचिव रवींद्र सोनावणे, सहसचिव अमोल पाटील जळगाव सचिव दीपक आर्डे यांच्या हस्ते करण्यात आले.

Web Title: Success of a player from Mangul Zhanak in soft tennis tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.