‘समाजकार्य’च्या विद्यार्थिनींचे यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:35 AM2021-02-15T04:35:48+5:302021-02-15T04:35:48+5:30
................ लोककलावंत संघटनेकडून समाजसेवकांचा सत्कार जऊळका रेल्वे : सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत विदर्भ लोककलावंत संघटनेकडून ११ फेब्रुवारी रोजी कलावंत व ...
................
लोककलावंत संघटनेकडून समाजसेवकांचा सत्कार
जऊळका रेल्वे : सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत विदर्भ लोककलावंत संघटनेकडून ११ फेब्रुवारी रोजी कलावंत व समाजसेवकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संघटनेचे अध्यक्ष संजय कडोळे, लोमेश चौधरी आदींची उपस्थिती होती.
.......................
कोरोना लसीकरण करून घेण्याचे आवाहन
वाशिम : दोन दिवसापूर्वी आपण स्वत: कोरोना लस घेतली. ही लस पूर्णत: सुरक्षित असून कोणतीही शंका किंवा भीती न बाळगता लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी संदीप महाजन यांनी केले आहे.
...............
पुरस्कार प्रस्तावांसाठी १५ फेब्रुवारीची मुदत
वाशिम : नेहरू युवा केंद्रामार्फत सामाजिक कार्य करणाऱ्या युवा मंडळांना पुरस्कार देण्यात येणार आहे. त्यासाठी प्रस्ताव सादर करण्याची मुदत १५ फेब्रुवारी असून संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा युवा अधिकारी सम्यक मेश्राम यांनी केले आहे.
.............
गावठाणच्या सीमा निश्चित करा!
वाशिम : स्वामित्व योजनेच्या पहिल्या टप्प्यात गावठाणच्या सीमा निश्चित करणे आवश्यक आहे. ही कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी केले आहे.
............
‘ते’ प्रस्ताव नियमानुकूल करण्याची मागणी
किन्हीराजा : निवासी अतिक्रमणाचे प्रस्ताव तात्काळ नियमानुकूल करण्यात यावेत, अशी मागणी मानवी हक्क सुरक्षा दलाचे अध्यक्ष जगदीश इंगळे, अध्यक्ष पंचफुला गायकवाड यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. (फोटो - १८)
..............
रस्त्याचे काम प्रलंबित ; नागरिक त्रस्त
वाशिम : शहरातील नंदीपेठ भागात रस्त्याचे काम प्रलंबित आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले असून स्थानिक नगर परिषदेने हे काम तात्काळ पूर्ण करावे, अशी मागणी निखिल बुरकुले, आकाश कुटे यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे.
...............
लक्षणे असल्यास तातडीने चाचणी करा
मेडशी : आजूबाजूच्या जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्या अनुषंगाने लक्षणे दिसून आल्यास तातडीने कोरोना चाचणी करावी, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी येथे शनिवारी केले.
...............
रस्तानिर्मितीच्या कामास होणार प्रारंभ
मालेगाव : बेलखेडा ते पार्डी तिखे (४.५ कि.मी.), येवती ते रिठद २ (किमी) आणि शिरसाळा ते रिठद या २ किमी अंतराच्या रस्तानिर्मितीस मंजुरी मिळाली असून, लवकरच काम सुरू होणार असल्याची माहिती आ. अमित झनक यांनी दिली.
.................
द. चिं. व्याख्यानमाला कार्यक्रमास प्रतिसाद
वाशिम : स्व. द. चिं. सोमण स्मृती व्याख्यानमाला दरवर्षी घेण्यात येते. त्यानुसार १२ फेब्रुवारी रोजी डॉ. ऊर्मिला चाकूरकर यांनी ‘जीवन एक प्रवास’ या विषयावर व्याख्यान दिले. त्यास चांगला प्रतिसाद मिळाला.
............
प्रवेशपत्र डाऊनलोड करण्याचे आवाहन
वाशिम : जवाहर नवोदय विद्यालयाची परीक्षा २४ फेब्रुवारी रोजी होणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्र संकेतस्थळावरून डाऊनलोड करून घ्यावे, असे आवाहन प्राचार्य आर. एस. चंदनशिव यांनी केले आहे.