स्त्री जन्माचे स्वागत करण्याचा प्रशासनाचा असाही उपक्रम!
By admin | Published: January 5, 2017 02:13 AM2017-01-05T02:13:56+5:302017-01-05T02:13:56+5:30
वाशिम जिल्हा प्रशासनाने अभिनंदन पत्र व मिठाई देऊन स्त्री जन्माचे स्वागत करण्याचा उपक्रम हाती घेतला.
वाशिम, दि. ४- सावित्री-जिजाऊ दशरात्रोत्सवाला ३ जानेवारीपासून सुरुवात झाली असून, या दरम्यान अभिनंदन पत्र व मिठाई देऊन स्त्री जन्माचे स्वागत करण्याचा उपक्रम जिल्हा प्रशासनाने हाती घेतला आहे.
पूर्वीच्या तुलनेत आता महिला बर्यापैकी यशाची शिखरे गाठत आहेत. मात्र, पुरुषांच्या तुलनेत स्त्री जन्मदराचे प्रमाण कमी असल्याने पुरुष-स्त्री लिंगगुणोत्तरात तफावत निर्माण होत आहे. तफावतीची ही दरी कमी करण्यासाठी केंद्र शासनाने ह्यबेटी बचाओ-बेटी पढाओह्ण अभियान सुरू केले असून, यामध्ये वाशिम जिल्ह्याचा समावेश आहे. पुरुष-स्त्री लिंगगुणोत्तराचे प्रमाण वाढविणे आणि मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिल्हा प्रशासन, महिला व बालकल्याण विभाग आणि आरोग्य विभागाने स्त्री जन्माचे स्वागत करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. बालिका दिनाचे औचित्य तसेच सावित्री-जिजाऊ दशरात्रोत्सवानिमित्त आरोग्य केंद्रात जाऊन स्त्री जन्माचे स्वागत, मातांचे अभिनंदन केले जात आहे. ३ व ४ जानेवारीला जिल्हा रुग्णालयात मान्यवरांच्या उपस्थितीत हा उपक्रम राबविण्यात आला. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, सीईओ गणेश पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी योगेश जवादे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकारला.