‘सुदामा चरित्र’ हा भागवताचा आत्मा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:45 AM2021-08-19T04:45:04+5:302021-08-19T04:45:04+5:30
दायमा पुढे म्हणाले की, भगवान कृष्ण व सुदामात अतुट प्रेम व मैत्री होती. सुदामाचे पोहे श्रीकृष्णाने ग्रहण केले. मनुष्याने ...
दायमा पुढे म्हणाले की, भगवान कृष्ण व सुदामात अतुट प्रेम व मैत्री होती. सुदामाचे पोहे श्रीकृष्णाने ग्रहण केले. मनुष्याने जीवनाचा उद्देश समोर ठेवून भगवंताच्या शरण गेले पाहिजे. माणसाने श्रध्दा, भक्ती व समर्पण भावनेने भागवत कथेचे श्रवण, मनन व पठण करायला हवे. तेव्हाच भगवंताची प्राप्ती होणे शक्य आहे. मनुष्याने बहीण, मुलगी, मित्र व गुरू यांना भेटण्यासाठी जाताना कधीही रिकाम्या जाताने जाऊ नये. काहीतरी सोबत भेटवस्तू न्यायला हवी. गुरू, आई-वडिलांचा आदर करा, त्यांची सेवा करा, तोच खरा धर्म आहे, असेही ते म्हणाले.
यावेळी गायत्री सत्संग परिवारात सहभागी नवीन सदस्यांचा सत्कार करण्यात आला. विशाल दायमा यांनी सुदामाची भूमिका साकारली. रुक्मिणीमाता व भगवान कृष्णाची भूमिका पप्पू चरखा, ज्योती चरखा, कल्याणी चरखा यांनी साकारली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आनंद दायमा यांनी केले. संचालन नीलेश सोमाणी यांनी केले. फेसबुक व यू-ट्युबच्या माध्यमातून भाविकांनी कथेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आनंद दायमा यांनी केले.