अचानक लागलेल्या आगीत शेकडो वृक्ष जळून खाक!

By admin | Published: May 22, 2017 01:21 AM2017-05-22T01:21:53+5:302017-05-22T01:21:53+5:30

मालेगाव येथील प्रकार : वाहतूकही काही काळ ठप्प

Suddenly a fire burned hundreds of trees! | अचानक लागलेल्या आगीत शेकडो वृक्ष जळून खाक!

अचानक लागलेल्या आगीत शेकडो वृक्ष जळून खाक!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव: अकोला फाट्यानजीक असलेल्या मोठ्या पुलाखालील मदन काळे यांच्या शेताच्या धुऱ्याला लागलेली आग सुमारे ४०० मीटर पसरत जाऊन शेकडो वृक्ष बेचिराख झाले. ही घटना २१ मे रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. आगीच्या धुरामुळे मालेगाव-अकोला या मार्गावरील वाहतूकही काही काळ ठप्प झाली होती.
अकोला फाट्यावरील मोठ्या पुलाखालून कॅनॉल गेलेले आहे. त्याच्या आसपास विविध प्रजातींची शेकडो वृक्ष आहेत. बाजूला मुंदडा जिनिंग फॅक्टरी तसेच नव्याने सुरू झालेला रिलायन्स पेट्रोलपंप आहे. २१ मे रोजी मदन मस्के यांच्या धुऱ्याच्या खालील बाजूस अचानकपणे लागलेल्या आगीत ३०० ते ४०० मीटरचा संपूर्ण परिसर बेचिराख झाला. आगिचे वृत्त कळताच मदन बळी यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि विहिरीवरची मोटरपंप सुरू करून आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. यावेळी पांडुरंग खुळे, संदीप बळी, अमोल नवले, रुपेश बळी यांनीही आपापल्या परीने योगदान दिले. दरम्यान, या घटनेने सर्वत्र आगीचे डोंब व धूर उठल्याने या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

Web Title: Suddenly a fire burned hundreds of trees!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.