शेतातील ऊस कृषी विभागाच्या कागदावरून गायब

By admin | Published: December 16, 2014 12:09 AM2014-12-16T00:09:39+5:302014-12-16T00:09:39+5:30

मालेगाव तालुक्यात १५0 हेक्टरवर ऊस : कृषी विभागाच्या लेखी केवळ एका हेक्टरवर ऊस, पिकांच्या नोंदीत घोळ.

Sugarcane in the field disappeared from the Department of Agriculture | शेतातील ऊस कृषी विभागाच्या कागदावरून गायब

शेतातील ऊस कृषी विभागाच्या कागदावरून गायब

Next

संतोष वानखडे/वाशिम
शेतातील पिकांचा ह्यलेखाजोखाह्ण ठेवणारा कृषी विभाग प्रत्यक्ष पीकनिहाय क्षेत्रफळाची नोंद कशी करतो, याचे कारनामे समोर येत आहेत. गत काही वर्षांपासून मालेगाव तालुक्यात ऊसाखालील प्रत्यक्ष क्षेत्रफळात वाढ होत असतानाही, कृषी विभागाच्या लेखी मालेगाव तालुक्यात केवळ एक हेक्टरवर ऊसाची लागवड झाली आहे. कृषी विभागाच्या कागदाने शेतातील ऊसच गायब केल्याने, बेजबाबदारपणा चव्हाट्यावर आला आहे.
शेतकर्‍यांनी शेतात काय-काय पेरले, याची नोंद घेण्याची जबाबदारी गावपातळीवरील कृषी कर्मचार्‍यांवर निश्‍चित करण्यात आलेली आहे. कृषी कर्मचारी, तालुका कृषी अधिकारी कार्यालय आणि नंतर तेथून सदर नोंद जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाकडे रवाना केली जाते. गत पाच-सहा वर्षांपासून शेतातील प्रत्यक्ष पिकांच्या नोंदीमध्ये महसूल व कृषी विभागाच्या कर्मचार्‍यांनी ह्यघोळह्ण करून ठेवला असल्याचेही कारनामे समोर येत आहेत. प्रत्यक्ष शेतात जाऊन पिकांची नोंद कागदावर घेतली जात नसल्याची बाब कृषी विभागाच्या आकडेवारीने अधोरेखीत केली आहे. मालेगाव तालुक्यात जवळपास १00 हेक्टरच्या वर ऊसाखालील प्रत्यक्ष क्षेत्र आहे; मात्र कृषी विभागाच्या लेखी २0१२-१३ आणि २0१३-१४ मध्ये केवळ एका हेक्टरवर तर २0१४-१५ मध्ये ऊसाची लागवडच झाली नसल्याची नोंद आहे. जिल्ह्यातील शेकडो हेक्टरवरील ऊस कृषी विभागाने जणू गायब केला आहे.

*सर्वेक्षणावर प्रश्नचिन्ह
शेतकर्‍यांनी शेतात कशाची पेरणी किंवा लागवड केली, याची माहिती कृषी कर्मचार्‍यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन करण्याचे सक्त आदेश आहेत. मात्र मालेगाव तालुका ऊसविरहित नोंदविल्याने सर्वेक्षण झाले कुठे? हा संशोधनाचा विषय आहे. शहरी भागात किंवा अन्यत्र बसून पीक पेरणीच्या नोंदी घेतल्या जात असल्याची बाब कृषीच्या आकडेवारीने समोर आणली.

Web Title: Sugarcane in the field disappeared from the Department of Agriculture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.