सुभाष राठोड यांची आत्महत्याग्रस्त कुटुंबियास भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 02:44 PM2019-01-08T14:44:06+5:302019-01-08T14:44:35+5:30
मानोरा : तालुक्यातील शेंदोना येथील सततच्या नापीकीने व थकीत कर्जाला कंटाळून बंडू बाबुलाल राठोड यांनी ३१ डिसेंबर रोजी आत्महत्या केली होती. या आत्महत्याग्रस्त कुटुंबियांची शिवसेनेचे माजी जि.प.सदस्य डॉ.सुभाष राठोड यांनी ७ जानेवारी रोजी भेट घेवून सांत्वन केले व औषधीसाठी आर्थीक मदत केली.
लोकमत न्यूज नेटवर्क

दुष्काळामुळे हाताला काम नसल्याचे कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी बंडु राठोड हे दोन महिन्यापासून आपल्या कुटुंबासह सोलापूर जिल्हयात उस तोडणीच्या कामाला गेले होते. घरी वयोवृध्द वडील आजारी पडल्याची बातमी कळताच कामधंदा सोडून ते घरी आले होते. आजारी वडीलांना पाहून सततच्या नापीकीने व बँकेच्या कर्जान हतबल होवून विष प्राशन करून आत्महत्या केली.
या दुष्काळाच्या गंभीर अवस्थेमुळे शेतकरी आत्महत्या करत असल्याचे कळताच डॉ.सुभाष राठोड यांनी शेंदोना येथील या आत्महत्याग्रस्त कुटुंबाची भेट घेतली व कुटुंबाचे सांत्वन करून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतून मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. यावेळी डॉ.सुभाष राठोड यांचेसोबत आमकिन्हीचे माजी सरपंच सुभाष राठोड, गोंडेगाव माजी सरपंच वामन राठोड, गोंडेगाव माजी सरपंच लक्ष्मण मानकर, शिवसेनेचे मन्साराम राठोड, निलेष राठोड, उल्हास चव्हाण, श्रीकान्त राठोड व चंदु जाधव ईत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.