मालेगावात युवकास मारहाण

By admin | Published: May 8, 2017 01:23 AM2017-05-08T01:23:39+5:302017-05-08T01:23:39+5:30

मालेगाव शहरातील घटना; आठ युवकांकडून जबर मारहाण.

Suicide killer in Malegaon | मालेगावात युवकास मारहाण

मालेगावात युवकास मारहाण

Next

मालेगाव : शहरातील पोलीस ठाण्यासमोरील जुने बसस्थानक परिसरात गणेश सत्यनारायण अहिर नामक २२ वर्षीय युवकाला १८ ते २0 वयोगटातील आठ युवकांकडून जबर मारहाण करण्यात आली. ही घटना रविवार, ७ मे रोजी सायंकाळी ७.२५ वाजेच्या सुमारास घडली.
मारहाणदरम्यान गणेश घाबरलेल्या अवस्थेत जाट गल्लीत घराकडे पळत असताना संबंधित आरोपी युवकांनी त्याचा पाठलाग करून त्यास जबर स्वरूपात मारहाण केली. यात गणेशच्या छातीत व डोक्याला मार लागला आहे. त्याला उपचारांसाठी वाशिम येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात पाठविण्यात आले. ६ मे रोजी लग्नासाठी कुलर घेवून जात असताना आज मारहाण करणार्‍या एका युवकाला गणेशचा धक्का लागला होता. त्यावेळी हे प्रकरण मिटले होते. मात्र, त्याचा वचक काढण्याच्या उद्देशानेच ७ मे रोजी ही घटना घडल्याची चर्चा येथे होती. याबाबत दिनेश अहिर यांनी फिर्याद दाखल केली. वृत्त लिहिस्तोवर याप्रकरणी कारवाईची प्रक्रिया सुरू होती.

Web Title: Suicide killer in Malegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.