करंजी येथील अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2019 03:09 PM2019-12-11T15:09:26+5:302019-12-11T15:51:31+5:30
करंजी येथील अल्पभूधारक शेतकऱ्याने आत्महत्या केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर जैन (वाशिम) : येथून जवळच असलेल्या करंजी येथे अल्पभूधारक शेतकरी जनार्दन आत्माराम लहाने (वय ४५ वर्षे)याने सततच्या नापिकीला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवार, ११ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता उघडकीस आली. मालेगाव तालुक्यातील शिरपूर पोलीस स्टेशनअंतर्गत येणाºया करंजी येथील जनार्दन लहाने यांच्या कुटुंबात ५७ आर. इतकी सामुहिक शेती आहे. अगोदरच अल्पभूधारक व त्यातही नैसर्गिक संकटाने व सततच्या नापिकीने जनार्दन लहाने त्रस्त झाले होते. त्यामुळे त्यांनी या त्रासातून कायमचे मुक्त होण्यासाठी घरालगत असलेल्या गुरांच्या गोठ्यात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. मृतक जनार्दन लहाने यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व विवाहित मुलगी असा परिवार आहे. घटनेची माहिती मिळताच शिरपूर पोलिस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल माणिकराव खानझोडे यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली.