किनखेडा येथे उन्हाळी भुईमूग पीक शेतीदीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:41 AM2021-03-26T04:41:23+5:302021-03-26T04:41:23+5:30
कृषी विज्ञान केंद्र वाशिमद्वारे बुधवारी राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानरंतर्गत भुईमूग पीक प्रात्यक्षिकाचे आयोजन किनखेडा, मैराळडोह येथे उन्हाळी हंगामात करण्यात ...
कृषी विज्ञान केंद्र वाशिमद्वारे बुधवारी राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानरंतर्गत भुईमूग पीक प्रात्यक्षिकाचे आयोजन किनखेडा, मैराळडोह येथे उन्हाळी हंगामात करण्यात आले.
वाशिम जिल्ह्यात उन्हाळी हंगामात भुईमूग नगदी तेलबिया पीक म्हणून घेतल्या जाते. भुईमूग पीक प्रात्यक्षिकात सुधारीत शिफारस तंत्रप्रसार व समस्या निरसन करून प्रयोगशील शेतकऱ्यांना अधिक उत्पादन, नफा मिळण्याच्या हेतूने मार्गदर्शन करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. रविंद्र काळे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम, शेतभेट नियोजन तसेच शेतीदिनाचे आयोजन किनखेडा येथील प्रगतशील शेतकरी अमोल धाबे यांचे शेतात २२ मार्च २०२१ रोजी करण्यात आले.
या कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य सुनील गायकवाड तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून कृषी विज्ञान केंद्र वाशिमचे तज्ञ एस. के. देशमुख (कृषीविस्तार) व टी. एस. देशमुख (कृषिविद्यातज्ञ ) यांची उपस्थिती लाभली. प्रयोगशील शेतकरी अमोल धाबे यांनी प्रास्ताविकातून भुईमूग पीकाचे अवगत तंत्र व शेतकरी पद्धतीमधील बदल सांगितले तसेच शेती प्रयोगातील स्वतचे अनुभव सांगितले. मार्गदर्शन सत्रात कृषिविद्यातज्ञ, टी. एस. देशमुख यांनी उन्हाळी भुईमूग पिकाचे विविध वान, पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया, पेरणी व रासायनिक खत मात्रा, जीप्संम् वापर, ओलित व्यवस्था, कीडरोग व्यवस्थापन तंत्र या बद्दल माहिती दिली.
एस. के. देशमुख यांनी भुईमुग पिकाच्या स्वतः शेतावरच बीजनिर्मिती करुंन पिक खर्च कमी करावा, असे सांगितले तसेच शिफारस शेती तंत्र प्रसारक म्हणून गावपातळीवर शेतीतंत्र दुत म्हणून महत्वाचे कार्य करावे, असे आवाहन केले. कार्यक्रमास मैराळडोह व किनखेडा येथील शेतकरी उपस्थित होते. आभार प्रदर्शन पुंडलिक घुगे यांनी केले.