वाशिम महसूल उपजिल्हाधिकारी पदी सुनील विंचनकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 04:07 PM2020-08-11T16:07:51+5:302020-08-11T16:07:58+5:30

वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी (महसूल) पदावर बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूरचे उपविभागीय अधिकारी सुनील विंचनकर यांची नियुक्ती केली आहे. 

Sunil Vinchankar as Washim Revenue Deputy Collector | वाशिम महसूल उपजिल्हाधिकारी पदी सुनील विंचनकर

वाशिम महसूल उपजिल्हाधिकारी पदी सुनील विंचनकर

googlenewsNext

लोकमत न्युज नेटवर्क
वाशिम: राज्यशासनाने  ३३ उपजिल्हाधिकाºयांसह ४० तहसीलदार संवर्गातील अधिकाºयांच्या बदल्यांचे आदेश १०  आॅगस्ट रोजी जारी केले. त्यात वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी (महसूल) पदावर बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूरचे उपविभागीय अधिकारी सुनील विंचनकर यांची, तर रिक्त असलेल्या वाशिम जिल्हा पुरवठा अधिकारी पदावर बुलडाण्याच्या उपजिल्हा निवडणूक अधिकारी गौरी सावंत यांची नियुक्ती केली आहे. 
राज्यशासनाने कोविड-१९ या संसर्गजन्य रोगाच्या पृष्ठभूमीवर सन २०२०-२१ या आर्थिक वर्षातील बदल्या संदर्भात सुचना निर्गमित केल्या आहेत. त्यात वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी (महसूल) पदावर बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूरचे उपविभागीय अधिकारी सुनील विंचनकर यांची, तर रिक्त असलेल्या वाशिम जिल्हा पुरवठा अधिकारी पदावर बुलडाण्याच्या उपजिल्हा निवडणूक अधिकारी गौरी सावंत यांची नियुक्ती केली आहे. शिवाय जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार महसूल या पदावर कार्यरत शितल बापुराव वाणी यांना ३१ मार्च २०२१ पर्यंत मुदतवाढ दिली आहे, तर मानोराचे तहसीलदार डॉ. सुनील बापुराव चव्हाण यांची यवतमाळ जिल्ह्यातील कळंब येथील रिक्त तहसीलदार पदावर बदली करण्यात आली आहे.

Web Title: Sunil Vinchankar as Washim Revenue Deputy Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.