पुरवठा विभागाने पकडला तांदळाचा ट्रक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2020 04:13 PM2020-11-21T16:13:11+5:302020-11-21T16:14:35+5:30
पुरवठा अधिकारी रूपाली सोळंके यांनी हा ट्रक पकडला
मानोरा : तांदळाची वाहतूक करणारा ट्रक पुरवठा विभागाने मानोरा ते दिग्रस या मार्गावर २१ नोव्हेंबर रोजी पकडला. पुढील चौकशीसाठी ट्रक हा पोलीस स्टेशनच्या आवारात लावण्यात आला.
मानोरा ते दिग्रस या मार्गावरून एम. एच. ३१ एफ. सी ९९७४ क्रमांकाचा ट्रक तांदूळ घेऊन जात असल्याची माहिती पुरवठा विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पुरवठा अधिकारी रूपाली सोळंके यांनी हा ट्रक पकडला. चौकशीसाठी पोलीस स्टेशनच्या आवारात ट्रक लावण्यात आला. ट्रकमध्ये असलेले तांदळाचे काही कट्टे उघडून पाहण्यात आले. त्यानंतर सर्व कट्टे परत ट्रकमध्ये भरण्यात आले. ही पाहणी केवळ अर्ध्या तासात आटोपली. यासंदर्भात सोळंके यांना विचारणा केली असता हा तांदुळ पुरवठा विभागाचा नाही असे सांगून ट्रक चालकाकडे रितसर पावती आहे असे स्पष्ट केले. मानोरा तालुक्यात कोणत्याच प्रकारचे तांदूळ उत्पादन होत नसतानाही मोठ्या प्रमाणावर तांदळाची वाहतूक होते, याबाबत आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.