मंगरूळपिर शहराला गढुळ पाणीपुरवठा; मोतसावंगा धरणात केवळ ६ टक्के जलसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 02:29 PM2018-01-30T14:29:55+5:302018-01-30T14:31:25+5:30
मंगरूळपीर (वाशिम) : शहराला नजिकच्या मोतसावंगा येथून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, या धरणात आज घडिला केवळ ६ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याने आठ ते दहा दिवसआड पाणी मिळत असून ते देखील गढुळ स्वरूपातील असल्याचे आढळून येत आहे.
मंगरूळपीर (वाशिम) : शहराला नजिकच्या मोतसावंगा येथून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, या धरणात आज घडिला केवळ ६ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याने आठ ते दहा दिवसआड पाणी मिळत असून ते देखील गढुळ स्वरूपातील असल्याचे आढळून येत आहे.
मंगरुळपीर शहराला पाणीपुरवठा करणाºया मोतसावंगा धरणात केवळ ६ टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्यामुळे शहराला पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. मंगरूळपीर नगर परिषदेनेही सुरूवातीपासून पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन न केल्याने सद्या आणि भविष्यात पाणीटंचाईचा प्रश्न अधिकच गंभीर स्वरूप धारण करणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
याशिवाय शहरातील काही भागात आजही नादुरूस्त पाईपलाईनव्दारे पाणीपुरवठा केला जात असून मध्येच हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होण्यासोबतच अधिकांशवेळा नळाव्दारे गढूळ तथा दुषित पाणी येत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडल्याने विविध स्वरूपातील आजारांशी सामना करावा लागत आहे.
पर्यायी पाणीपुरवठ्याचा प्रश्न प्रलंबित!
यावर्षीच्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी सोनल मध्यम प्रकल्पातून मोतसावंगा प्रकल्पात पाईपलाईनव्दारे पाणी सोडले जाणार आहे. मात्र, यासंदर्भातील कृती आराखडा सद्यातरी केवळ कागदावरच आहे. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रशासनाने सक्रीय पुढाकार घ्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.