फाट्यावरील हातपंपाचा वाटसरूंना आधार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:28 AM2021-07-02T04:28:13+5:302021-07-02T04:28:13+5:30
--------------- उंबर्डा येथे स्वच्छतेबाबत मार्गदर्शन वाशिम: उंबर्डा बाजार येथे रस्त्यावर कचरा टाकण्यात येत असल्याने गावात घाण वाढत आहे. या ...
---------------
उंबर्डा येथे स्वच्छतेबाबत मार्गदर्शन
वाशिम: उंबर्डा बाजार येथे रस्त्यावर कचरा टाकण्यात येत असल्याने गावात घाण वाढत आहे. या पृष्ठभूमीवर सरपंचांच्या मार्गदर्शनात ग्रामसचिवांनी सभा घेऊन स्वच्छता राखण्याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते.
-----
मानोरा मार्गावर वाहनांची तपासणी
चौसाळा : वाहतूक नियमांच्या उल्लंघन करणाऱ्यांवर नियंत्रणासाठी कारंजा-मानोरा मार्गावर दुचाकी वाहनांची तपासणी पोलिसांकडून केली जात आहे. याअंतर्गत सोमठाणा चेकपोस्ट पोलिसांनी वाहनांची कसून तपासणी मंगळवारी केली.
------
घरच्या बियाण्यांवर प्रक्रिया
वाशिम: बियाणे आणि खतांच्या दरात यंदा मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. प्रामुख्याने सोयाबीन, मूग आणि उडिदाच्या बियाण्यांचे दर वाढल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. त्यामुळेच यंदा देपूळ परिसरातील शेतकरी घरचे बियाणे वापरण्यावर भर देत आहेत.
^^^^^^^^^
शिरपुरात पोलिसांची संख्या अपुरी
शिरपूर : जिल्ह्यातील सर्वांत मोठी ग्रामपंचायत असलेल्या शिरपूर जैन येथील पोलीस स्टेशनअंतर्गत जनतेच्या सुरक्षेसाठी आवश्यक संख्येत पोलीस कर्मचारी नाहीत. त्यामुळे कार्यरत पोलीस कर्मचाऱ्यांवर कायदा-सुव्यवस्था अबाधित राखताना ताण येत आहे.
^^^^^^^^
हवामान यंत्र कुचकामी
आसेगाव: येथे चार वर्षांपूर्वी हवामानाच्या माहितीसाठी स्वयंचलित हवामान यंत्र स्थापित करण्यात आले; परंतु हे यंत्र नादुरूस्त झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना या यंत्रांचा काही एक फायदा होत नसल्याचे दिसत आहे.
----
ग्रामपंचायतीकडून नाल्यांची साफसफाई
वाशिम : पावसाळ्याला सुरुवात झाली असल्याने गावात नाल्यांतील सांडपाण्यामुळे आरोग्याला असलेला धोका लक्षात घेत कारंजा तालुक्यात लोहगाव महागाव ग्रामपंचायतीच्यावतीने सोमवारपासून नाल्यांची सफाई सुरू करण्यात आली आहे.
^^^^
पपई पिकावर रोगाचा प्रादुर्भाव
वाशिम: कारंजा तालुक्यातील कामरगाव शिवारात पपईच्या झाडांवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. शेतकऱ्यांनी याबाबत काळजी घेऊन परिस्थिती गंभीर असल्यास कृषी विभागाचा सल्ला घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी संतोष वाळके यांनी मंगळवारी केले.
^^^^^^^^^