कोमात असलेल्या मुलाच्या देहदानाचा निर्णय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2017 08:26 PM2017-08-08T20:26:11+5:302017-08-09T03:11:52+5:30

मालेगाव (वाशिम) : अगदीच हसतखेळत आयुष्यातील एकेक दिवस उलटत असताना १७ जून २०११ रोजी झालेल्या अपघातात त्याच्या मेंदूला मार लागला. तेव्हापासून आजतागायत तो कोमात आहे. दरम्यान, आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही आई-वडिलांनी मुलाच्या उपचारात कसर न ठेवता जवळ असलेली शेती विकून, बँकेसह नातेवाईकांकडून कर्ज घेवून तब्बल ४० लाख रुपये खर्चत त्याच्यावर उपचार केला; परंतू त्याचा काहीच फायदा झाला नाही. अखेर नियतीपुढे हात टेकलेल्या अभाग्या आई-वडिलांनी जड अंत:करणाने आपल्या मुलाच्या देहदानाचा निर्णय घेतला आहे. 

Suraj's body decapitated decision due to lack of money for the treatment! | कोमात असलेल्या मुलाच्या देहदानाचा निर्णय!

कोमात असलेल्या मुलाच्या देहदानाचा निर्णय!

Next
ठळक मुद्दे दोन महिन्यांपूर्वी झाला होता अपघातअपघातात त्याच्या मेंदूला मार लागला  आर्थिक परिस्थिती बेताची 

अरविंद गाभणे 
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव (वाशिम) : अगदीच हसतखेळत आयुष्यातील एकेक दिवस उलटत असताना १७ जून २०११ रोजी झालेल्या अपघातात त्याच्या मेंदूला मार लागला. तेव्हापासून आजतागायत तो कोमात आहे. दरम्यान, आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही आई-वडिलांनी मुलाच्या उपचारात कसर न ठेवता जवळ असलेली शेती विकून, बँकेसह नातेवाईकांकडून कर्ज घेवून तब्बल ४० लाख रुपये खर्चत त्याच्यावर उपचार केला; परंतू त्याचा काहीच फायदा झाला नाही. अखेर नियतीपुढे हात टेकलेल्या अभाग्या आई-वडिलांनी जड अंत:करणाने आपल्या मुलाच्या देहदानाचा निर्णय घेतला आहे. 
मालेगावमध्ये वास्तव्यास असलेल्या लव्हाळे कुटूंबियासोबत नियतीने खेळलेला खेळ ह्रदय पिळवटून टाकणारा ठरावा असाच आहे. वसंतराव आणि वनिता या दाम्पत्याच्या पोटी जन्मलेल्या दोन मुलांमध्ये मोठा मुलगा असलेला सुरज हा घरात लाडका होता. धष्टपूष्ट शरीरयष्टीच्या सुरजने १२ वी पर्यंतच्या शिक्षणानंतर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून पदविका प्राप्त केली. २०११ मध्ये त्याची तांत्रिक अ‍ॅप्रेंटिसशिप सुरू होती. मात्र, सर्व काही सुरळित सुरू असताना नियतीची त्याच्यावर वक्रदृष्टी फिरली आणि होत्याचे नव्हते झाले. १७ जून २०११ रोजी मालेगाव-अकोला राज्य महामार्गावरील रिधोरा फाट्यानजिक मोटारसायकलने प्रवास करित असताना सुरजचा अपघात झाला. या घटनेत त्याच्या मेंदुला जबर मार लागला. दरम्यान, अकोला येथील हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर मोठी शस्त्रक्रिया झाली; परंतू मार अधिक असल्याने शस्त्रक्रियेला प्रतिसाद मिळण्याऐवजी तो कोमात गेला. त्यानंतर आई-वडिलांनी सुरजला नागपूरच्या मोठ्या दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. त्याठिकाणी तब्बल एक महिना त्याच्यावर उपचार चालले. मात्र, त्याचाही विशेष उपयोग झाला नाही. त्यामुळे शेवटी नाईलाजास्तव सुरजला घरी आणण्यात आले. तेव्हापासून आजतागायत तो घरातील अंथरूणावर खिळून आहे. मागील पाच वर्षांत त्याची सुश्रृषा करण्यात, त्याच्या औषधोपचारावर खर्च करण्यात आई-वडिलांनी कुठलीच कसर ठेवली नाही. मात्र, शेती विकून झाली, कर्जाचा मोठा डोंगर ‘आ’ वासून पुढे उभा झाल्याने यापुढील उपचारासाठी आई-वडिलांकडे पैसे शिल्लक राहिले नसल्याने त्यांनी आता सुरजच्या देहदानाचा निर्णय घेतला असून त्यादिशेने प्रयत्न सुरू केले आहेत. 

Web Title: Suraj's body decapitated decision due to lack of money for the treatment!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.