वाशिम जिल्ह्यात भौगोलिक माहिती प्रणालीच्या आधारे मालमत्तांचे सर्वेक्षण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 02:32 PM2018-03-28T14:32:34+5:302018-03-28T14:32:34+5:30
वाशिम : जिल्ह्यातील नगर पालिका व नगर पंचायत क्षेत्रातील रहिवासी भागात वास्तव्य करणाऱ्या नागरिकांकडील मालमत्तांचे भौगोलिक माहिती प्रणालीवर (जीआयएस) आधारित सर्वेक्षण केले जात आहे.
वाशिम : जिल्ह्यातील नगर पालिका व नगर पंचायत क्षेत्रातील रहिवासी भागात वास्तव्य करणाऱ्या नागरिकांकडील मालमत्तांचे भौगोलिक माहिती प्रणालीवर (जीआयएस) आधारित सर्वेक्षण केले जात आहे. एस-२ इन्फो लि. या कंपनीचे प्रतिनिधी या कामासाठी घरांवर धडक देत मालमत्तांची संपूर्ण माहिती जाणून घेत असल्याचे दिसून येत आहे.
शहरांधील नागरिकांना चांगल्या तथा दर्जेदार सुविधा पुरविता याव्या, यासाठी महाराष्ट्र शासनाने महा-आयटी कंपनीच्या माध्यमातून राज्यभरातील नगर पालिका, नगर पंचायत क्षेत्रातील प्रत्येकाच्या मालमत्तांचे भौगोलिक माहिती प्रणालीच्या आधारे सर्वेक्षण करण्यास प्रारंभ केला आहे. याअंतर्गत वाशिम जिल्ह्याचे काम एस-२ इन्फोटेक लिमिटेड या कंपनीच्या प्रतिनिधींकडे सोपविण्यात आले असून सदर प्रतिनिधी नागरिकांच्या घरी जावून मालमत्तांचे छायाचित्र घेवून मालमत्तांचे मोजमाप करित आहेत. विजेचे बिल, कर आकारणी क्रमांकाची माहिती घेवून ती तत्काळ ‘आॅनलाईन अपलोड’ केली जात असल्याचे दिसून येत आहे. यामुळे नगर पालिका, नगर पंचायत क्षेत्रात वास्तव्य करणाºया नागरिकांकडे नेमकी किती मालमत्ता आहे, त्याचे बांधकाम किती झाले, याची अद्ययावत माहिती मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.