पंतप्रधान आवास योजनेंतर्गत मंगरूळपीर तालुक्यात गावोगावी सर्वेक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 02:05 PM2018-10-01T14:05:03+5:302018-10-01T14:07:19+5:30
मंगरुळपीर : प्रधानमंत्री आवास योजनेसह ग्रामीण भागात राबविण्यात येणाºया विविध घरकुल योजनेंतर्गत मंगरूळपीर तालुक्यात घरोघरी जावुन सर्व्हेक्षण केले जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरुळपीर : प्रधानमंत्री आवास योजनेसह ग्रामीण भागात राबविण्यात येणाºया विविध घरकुल योजनेंतर्गत मंगरूळपीर तालुक्यात घरोघरी जावुन सर्व्हेक्षण केले जात आहे.
ग्रामीण भागातील प्रत्येक पात्र कुटूंबाला घरकुलाचा लाभ मिळावा यासाठी प्रधानमंत्री आवास योजना राबविली जात आहे. या योजनेंतर्गत घरकुलापासुन कुणीही वंचित राहु नये म्हणुन घरोघरी जावुन सर्व्हेक्षण करण्याच्या सुचना मुख्य कार्यकारी अधिकारी दिपककुमार मिना यांनी दिलेल्या आहेत. त्या अनुषंगाने मंगरूळपीर तालुक्यात घरोघरी जाऊन पंचायत समितीचे कर्मचारी तसेच ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसचिव व अन्य कर्मचाºयांच्यावतीने सर्वेक्षण केले जात आहे. या सर्वेक्षणातून कोणताही पात्र लाभार्थी सुटणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही मीना यांच्याकडून मिळालेल्या आहेत. या सुचनेनुसार ग्रामसेवक व सरपंच यांच्याकडून सर्वेक्षण सुरू आहे. घरकुलाचा लाभ कुणाला मिळाला नाही, जागा अतिक्रमीत आहे, अतिक्रमित जागा नियमानुकूल करण्यात आली आहे का, नियमानुकूलसाठी प्रस्ताव तयार करणे, घरकुलासाठी संबंधित लाभार्थी खरोखरच पात्र आहे की नाही, या दृष्टिकोनातून पाहणी केली जात आहे. तालुक्यातील प्रत्येक गावात सदर सर्वेक्षण सुरू असून, पिंप्री येथे सरपंच बाळासाहेब ठाकरे व ग्रामसचिवांनी घराघरी जावुन सर्व्हेक्षण केले.