नुकसानग्रस्त शेतीचे सर्व्हेक्षण करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 08:24 PM2017-09-08T20:24:57+5:302017-09-08T20:25:14+5:30
वाशिम जिल्ह्यात यावर्षी सर्वात कमी पाऊस झाल्यामुळे पिकांची स्थिती अत्यंत वाईट आहे. प्रदिर्घ विश्रांतीनंतर आलेल्या पावसामुळे सोयाबिन पिकांवर अळींचा प्रादूर्भाव, पिक करपल्याच्या घटना; तर काहीठिकाणी सोयाबिन पिकाला शेंगाच लागल्या नसल्यामुळे शेतकºयांवर मोठे संकट ओढवले आहे. यासाठी संबंधित यंत्रणेला सर्व्हे करण्याचे आदेश देऊन तत्काळ अहवाल सादर करण्याबाबत निर्देश द्यावे, अशी मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष आ.राजेंद्र पाटणी यांनी कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्याकडे केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा लाड: वाशिम जिल्ह्यात यावर्षी सर्वात कमी पाऊस झाल्यामुळे पिकांची स्थिती अत्यंत वाईट आहे. प्रदिर्घ विश्रांतीनंतर आलेल्या पावसामुळे सोयाबिन पिकांवर अळींचा प्रादूर्भाव, पिक करपल्याच्या घटना; तर काहीठिकाणी सोयाबिन पिकाला शेंगाच लागल्या नसल्यामुळे शेतकºयांवर मोठे संकट ओढवले आहे. यासाठी संबंधित यंत्रणेला सर्व्हे करण्याचे आदेश देऊन तत्काळ अहवाल सादर करण्याबाबत निर्देश द्यावे, अशी मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष आ.राजेंद्र पाटणी यांनी कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्याकडे केली.
यासंदर्भातील निवेदनात पाटणी यांनी पुढे नमूद केले आहे की, कारंजा तालुक्यासोबतच जिल्हयातील इतर भागांचा पिक पाहणी दौरा केला असता अनेक शेतकºयांनी त्यांच्या व्यथा मांडल्या. तिन महिन्यात येणाºया पिकांच्या पेरणीस यावर्षी जिल्ह्यातील शेतकºयांनी सर्वाधिक पसंती दिली. मात्र, तब्बल महिना ते १५-२० दिवसानंतर असलेल्या अल्प पावसामुळे सोयाबीन, उडीद व मुगासारखी पिके रोगराईला बळी पडली. अनेक भागात सोयाबिन पिकाला शेंगाच आल्या नसल्याच्या घटनात वाढ झाली. हजारो हेक्टरवरील खरिपाचे पिक पुर्णत: करपुन गेले असुन अशातच अर्धवट करपलेली पिके तरली असली तरी वातावरणातील बदलामुळे पिकांवर रोगराई पसरली आहे.
संपुर्ण तालुक्यात प्रारंभी बरसलेल्या पावसावर खरीपाची पेरणी केली. मात्र, त्यानंतर महिनाभर पावसाने दडी मारल्याने खरीपाच्या पिकांना मोठा फटका बसला आहे. पावसाने ओढ दिल्यामुळे उंट अळीचा प्रादूर्भाव झाल्याने तालुक्यातील अनेक गावात सोयाबिन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसाअभावी संपुर्ण खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असुन या पिकांच्या नुकसानीचे शासनामार्फत तातडीने पंचनामे करण्यात यावे, अशी मागणी शेतकºयांकडून करण्यात येत आहे. पाहणीसाठी शेतकºयांच्या बांधावर स्वत: गेलो असता अनेक शेतकºयांनी आपल्याकडे त्यांच्या व्यथा मांडल्या. शेतकºयांच्या मते सप्टेंबर महिन्यापासुन रब्बीच्या पेरणीस सुरूवात होणार असुन खरिप पिकांत झालेले नुकसान भरून काढण्यासाठी आपण स्वत: जातीने लक्ष घालुन शासनाच्या ही बाब निर्दशनास आणुन देण्याची मागणी केली. तसेच त्वरित पंचनामे करून आर्थिक मदतीची मागणी केली. कारंजा-मानोरा मतदार संघातील तसेच जिल्ह्यातील इतरही तालुक्याची भयावह परिस्थिती पाहता संबंधित यंत्रणेला सर्व्हे करण्याचे आदेश देऊन तत्काळ अहवाल सादर करण्याबाबत निर्देश द्यावेत, अशी मागणी पाटणी यांनी कृषिमंत्री फुंडकर यांच्याकडे केली आहे.