सोयाबिन, कपाशीवरील किडींचे ‘मोबाईल अ‍ॅप’व्दारे सर्वेक्षण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2018 12:43 PM2018-08-07T12:43:43+5:302018-08-07T12:45:03+5:30

वाशिम : महाराष्ट्र शासनाच्या क्रॉपसॅप योजनेंतर्गत कपाशीवरील गुलाबी बोंडअळी आणि सोयाबिन पिकावरील प्रमुख किडींचे ‘मोबाईल अ‍ॅप’व्दारे सर्वेक्षण सुरू आहे.

Survey by mobile app' on soybean, cotton spots | सोयाबिन, कपाशीवरील किडींचे ‘मोबाईल अ‍ॅप’व्दारे सर्वेक्षण 

सोयाबिन, कपाशीवरील किडींचे ‘मोबाईल अ‍ॅप’व्दारे सर्वेक्षण 

googlenewsNext
ठळक मुद्देकिडींचे सुक्ष्म निरीक्षण घेणे व नोंदविणे कृषि विभागाने बंधनकारक केले आहे. किडींवर नियंत्रण मिळविण्याची मोहिम पूर्ण गतीने राबविण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : महाराष्ट्र शासनाच्या क्रॉपसॅप योजनेंतर्गत कपाशीवरील गुलाबी बोंडअळी आणि सोयाबिन पिकावरील प्रमुख किडींचे ‘मोबाईल अ‍ॅप’व्दारे सर्वेक्षण सुरू आहे. हे सर्वेक्षण अचुकपणे व्हावे, याकरिता जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने यांच्यासह तालुका कृषि अधिकारी, सर्व कृषि सहायक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी आदी यंत्रणा शेतकºयांच्या बांधावर पोहचून त्यांना मार्गदर्शन करित आहे. त्यास तालुक्यात चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती वाशिमचे तालुका कृषि अधिकारी अभिजित देवगिरीकर यांनी मंगळवारी दिली.
क्रॉपसॅप कार्यक्रमांतर्गत कृषि विभागातील सर्व अधिकारी, कर्मचाºयांना आठवड्यातून एक दिवस प्रत्यक्ष शेतकºयांच्या शेतात नेऊन किडींचे सुक्ष्म निरीक्षण घेणे व नोंदविणे कृषि विभागाने बंधनकारक केले आहे. त्यानुसार, सद्या यंत्रणेतील प्रत्येक अधिकारी व कर्मचारी या कामात गुंतला असून किडींवर नियंत्रण मिळविण्याची मोहिम पूर्ण गतीने राबविण्यात येत आहे. या मोहिमेत करडा येथील कृषि विज्ञान केंद्राचे कीड शास्त्रज्ञ डवरे यांच्यासह कृषि विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले आहेत, अशी माहिती अभिजित देवगिरीकर यांनी दिली.

Web Title: Survey by mobile app' on soybean, cotton spots

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.