५ सापांना जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:42 AM2021-03-31T04:42:14+5:302021-03-31T04:42:14+5:30
----- सोयाबीन खरेदीचे नियोजन वाशिम: जिल्ह्यात वाढत असलेला कोरोना संसर्ग लक्षात घेता बाजार समित्यांमधील शेतमाल विक्रीसाठी येणाºया शेतकºयांची गर्दी ...
-----
सोयाबीन खरेदीचे नियोजन
वाशिम: जिल्ह्यात वाढत असलेला कोरोना संसर्ग लक्षात घेता बाजार समित्यांमधील शेतमाल विक्रीसाठी येणाºया शेतकºयांची गर्दी नियंत्रित केली जात आहे. याच अनुषंगाने कारंजा येथील बाजार समितीत सद्यस्थितीत सोयाबीन खरेदीचे दिवस ठरविण्यात आले आहेत.
---------------
ज्येष्ठांनी तातडीने चाचणी करावी !
वाशिम : ज्येष्ठ नागरिकांना कोरोना संसर्गाची लागण लवकर होते. त्यामुळे सर्दी, ताप, खोकला, घशामध्ये खवखवणे यासारखी लक्षणे असल्यास त्यांनी तातडीने कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी केले आहे.
----------------
खरीप हंगामासाठी कृषी विभागाचे नियोजन
वाशिम: आगामी खरीप हंगामाची तयारी कृषी विभागाने केली असून, शेतकºयांना खते, बियाणे वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन केले जात आहे. शिवाय वीज जोडणीसह इतरही बाबींची माहिती घेतली जात आहे.