मानोरा तालुका कृषी अधिकारी निलंबीत
By admin | Published: May 4, 2017 07:35 PM2017-05-04T19:35:01+5:302017-05-04T19:35:01+5:30
तालुका कृषी अधिकारी समाधान पडघान यांनी कामामध्ये अक्षम्य दिरंगाई केल्यामुळे राज्याचे जलसंधारण मंत्री प्रा.राम शिंदे यांनी पडघान यांना ४ मे रोजी निलंबीत.
वाशिम :मानोरा तालुका कृषी अधिकारी समाधान पडघान यांनी कामामध्ये अक्षम्य दिरंगाई केल्यामुळे राज्याचे जलसंधारण मंत्री प्रा.राम शिंदे यांनी पडघान यांना ४ मे रोजी निलंबीत केल्याची माहिती पत्रकार परिषदेत स्वत: मंत्री महोदयांनी पत्रकारांना दिली. कारंजा तालुका कृषी अधिकारी समाधान धुळधुळे यांना सुध्दा आपण समज दिल्याचे शिंदे यांनी यावेळी सांगितले.
जिल्ह्यात सुरु असलेल्या जलयुक्त शिवार अभियान योजनेंतर्गत जलसंधारणाच्या कामामध्ये अक्षम्य दिरंगाई केल्यामुळे मानोऱ्याचे तालुका कृषी अधिकारी पडघान यांना निलंबीत केल्याची माहिती देतांना कारंजाचे तालुका कृषी अधिकारी धुळधुळे यांना समज देण्यात आल्याचे मंत्री महोदयांनी पत्रकारांना सांगितले. शासनाच्यावतीने सुरु असलेल्या जलसंधारणाच्या कामामध्ये कुठल्याही अधिकाऱ्याने यापुढे दिरंगाई केल्याचे आढळुन आल्यास त्यांच्यावर सुध्दा अशा प्रकारची कारवाई करण्यात येवुन त्यांची गय केली जाणार असे जलसंधारण मंत्री शिंदे यांनी सांगितले.