मालेगाव बाजार समितीच्या सचिवाचे निलंबन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 08:35 PM2017-09-29T20:35:00+5:302017-09-29T20:36:22+5:30

मालेगाव - मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव प्रकाश कढणे यांना निलंबित करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधक आर.एन.कटके यांनी दिले आहेत. सदर आदेशाची प्रत शुकवारी बाजार समितीच्या सभापतींना मिळाली आहे.

Suspension of Secretary of Malegaon Market Committee | मालेगाव बाजार समितीच्या सचिवाचे निलंबन 

मालेगाव बाजार समितीच्या सचिवाचे निलंबन 

Next
ठळक मुद्देजिल्हा उपनिबंधक आर.एन.कटके यांनी दिले आदेश समितीचे सचिव प्रकाश कढणे निलंबित

लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव - मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव प्रकाश कढणे यांना निलंबित करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधक आर.एन.कटके यांनी दिले आहेत. सदर आदेशाची प्रत शुकवारी बाजार समितीच्या सभापतींना मिळाली आहे.
सभापतींना प्राप्त झालेल्या जिल्हा उपनिबंधकांच्या २७ सप्टेंबर २०१७ च्या कार्यवाहीच्या पत्रात म्हटले की, १० मे २०१७ ते ३१ मे २०१७ या दरम्यान तुरीची नोंदणी करण्याचे कामकाज शासन निर्देशानुसार बाजार समिती स्तरावर सुरू होते. ३१ मे २०१७ पर्यंत नोंद घेऊन सचिव, सहायक निबंधक तथा सहकारी संस्था यांच्या स्वाक्षरीने संबंधित कार्यालयात माहिती सादर करणे आवश्यक होते. तथापि, कोणतीही माहिती सादर केली नाही. ३१ मे २०१७ पर्यंत नोंदणी करण्यात आली होती, त्यापेक्षा अधिक तूर खरेदी केल्याचे स्पष्ट झाले यासंदर्भात कारणे दाखवा नोटीस बजावली होती. यावर प्रकाश कढणे यांनी असमाधानकारक उत्तर दिल्याने त्यांच्याविरूद्ध महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री अधिनियम १९६३ कलम ४० ई नुसार तत्काळ निलंबनाची कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधक आर.एन.कटके यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती मालेगावच्या सभापतींना दिले आहेत.

४५ वर्षीय इसमाची आत्महत्या
मालेगाव - मालेगाव शहरातील रोहिदासपुरा येथील आश्रू उकांडा राठी (४५) यांनी सकाळच्या सुमारास शौचालयात गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत मृतकाचा मुलगा नारायण आश्रू राठी याने मालेगाव पोलिसांत फिर्याद दिली. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

सहा जनावरांची चोरी
मालेगाव - तालुक्यातील पांगरी कुटे येथील गोठ्यातून चार म्हशी, दोन वगार अज्ञात चोरट्यांनी २८ सप्टेंबरच्या रात्रीदरम्यान लंपास केली. यासंदर्भात देवेंद्र दयालसा बांडे यांनी मालेगाव पोलिसांत फिर्याद दिली. या जनावरांची किंमत अंदाजे दोन लाख ४ हजार रुपये असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. घटनेचा पुढील तपास मालेगाव पोलीस करीत आहेत.
 

Web Title: Suspension of Secretary of Malegaon Market Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.