‘सुजलाम्-सुफलाम’ची कामे डिझेलअभावी ठप्प!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2019 05:58 PM2019-02-05T17:58:16+5:302019-02-05T17:58:40+5:30
वाशिम : प्रशासकीय यंत्रणांनी मागणीनुसार जेसीबीला लागणारे डिझेल पुरवूनही पैसे थकीत असल्याने पेट्रोलपंपांनी डिझेल देण्यास नकार दर्शविला. यामुळे डिझेलअभावी ‘सुजलाम्-सुफलाम्’ची कामे ठप्प झाली आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : प्रशासकीय यंत्रणांनी मागणीनुसार जेसीबीला लागणारे डिझेल पुरवूनही पैसे थकीत असल्याने पेट्रोलपंपांनी डिझेल देण्यास नकार दर्शविला. यामुळे डिझेलअभावी ‘सुजलाम्-सुफलाम्’ची कामे ठप्प झाली आहेत. यासंदर्भात वाशिमच्या तालुका कृषी अधिकाºयांनी मंगळवार, ५ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकाºयांना पत्र लिहून याविषयी अवगत केले, हे विशेष.
वाशिमच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने अत्यंत सुक्ष्म नियोजन करून जलसंधारणाच्या २८८ कामांना प्रशासकीय मान्यता प्राप्त करून घेतली. त्यापैकी ढाळीचे बांध, डीप सीसीटी, साठवण शेततळे व सिमेंट नाला बांध खोलीकरण आदी स्वरूपातील कामांना कार्यारंभ आदेश देखील निर्गमित करण्यात आलेले आहेत. त्यानुषंगाने तालुक्यात दोन डीप सीसीटी, एक साठवण तलाव, दोन सिमेंट नाला बांध खोलीकरणाची कामे पूर्ण झाली. उर्वरित कामेही करण्यास अनुकुल वातावरण असून तशा उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, वाशिममधील पेट्रोलपंप चालकांनी जेसीबीला लागणाºया डिझेलचा पुरवठा करण्यास असमर्थता दर्शविली आहे. जोपर्यंत थकीत रक्कम अदा केली जात नाही, तोपर्यंत डिझेल मिळणार नाही, अशी भूमिका संबंधित पेट्रोलपंप चालकांनी घेतल्याने कामे ठप्प झाली आहेत. ही बाब लक्षात घेवून शासन परिपत्रकात नमूद बाबींव्यतीरिक्त झालेल्या खर्चास अर्थात ३ लाख ३९ हजार ४४५ रुपयांची रक्कम अदा करण्यास मान्यता देण्यात यावी. जेणेकरुन डिझेल उपलब्धतेचा तिढा सुटेल आणि थांबलेली कामे सुरू होतील. तसेच पेट्रोलपंप चालकांनाही डिझेल उपलब्ध करुन देण्याचे निर्देश द्यावे, अशी मागणी तालुका कृषी अधिकाºयांनी केली आहे.