निवडणुकीत स्वबळाचा नारा

By admin | Published: December 7, 2015 02:28 AM2015-12-07T02:28:01+5:302015-12-07T02:28:01+5:30

मालेगाव व मानोरा नगर पंचायत; बंडखोरी रोखण्याचे आव्हान

Swabal slogan in elections | निवडणुकीत स्वबळाचा नारा

निवडणुकीत स्वबळाचा नारा

Next

मालेगाव/मानोरा (जि. वाशिम): नगरपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच, प्रमुख पक्षांनी स्वबळाचा नारा देत मोर्चेबांधणीला सुरुवात केल्याने राजकीय वातावरण तापले आहे.
मालेगाव व मानोरा नगरपंचायत निवडणुकीत १0 डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याला सुरुवात होणार असून, १0 जानेवारीला मतदान होणार आहे. सत्तास्थापनेचा पहिला मान मिळविण्यासाठी प्रमुख पक्ष व आघाड्यांनी कंबर कसली. मालेगावात सत्ता स्थापन करण्याच्या दृष्टिकोनातून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना या पक्षांसह बबन चोपडे व चंदू जाधव हे सारेच कामाला लागले. नगराध्यक्ष बनण्याकरिता आरक्षित असलेल्या २, ८ व १३ क्रमांकाच्या वॉर्डांंंंवर सर्वांंंचेच लक्ष आहे. सध्या तरी कुणाची युती झाली नसल्याने प्रमुख पक्ष स्वबळावर लढण्याच्या तयारीने मैदानात उतरले आहेत. काही स्थानिक नेत्यांनी आघाडीची हाक दिली. उमेदवारही या ना त्या पक्षाची उमेदवारी मिळवण्यासाठी धडपडताना दिसत आहेत.
काँग्रेस पक्षातर्फे अद्याप कोणत्याच हालचाली दिसून येत नाहीत. आमदार अमित झनक व गोपाल मानधने हे काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीची नेतेमंडळी अमित झनक यांच्यासोबत फिरल्याचे सर्वश्रुत आहे. यावेळी ते एकमेकांच्या विरोधात उतरल्याने अस्पष्टता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची सूत्रे बाबाराव खडसे व उल्हासराव घुगे यांनी ताब्यात घेऊन १७ जागा लढवण्याचे जाहीर केले.
भाजपसुद्धा स्वबळावर १७ जागा लढणार, हे जाहीर असले तरी अद्याप कुणाच्या नेतृत्वात, हे स्पष्ट नाही. संतोष जोशी यांच्या नेतृत्वात शिवसेना सर्व जागा लढणार आहे. जिल्हा परिषद सदस्य चंदू जाधव आणि राष्ट्रवादीचे स्थानिक नेते बबनराव चोपडे हे स्वतंत्रपणे १७ जागा लढविणार आहेत. रिपाइं (आठवले गट) ने व भारिप-बमसंनेही निवडणुकीची हाक दिल्याने राजकारण तापले आहे. सारेच स्वबळावर लढण्याची भाषा करीत असल्याने निवडणुकीत चुरस निर्माण झाली. चंदू जाधव यांना सोबत घेऊन परंपरागत मैत्री असणारे भाजपा-सेना एकत्र लढतील, असा सर्वांंंंचा अंदाज होता; मात्र त्यांच्यामध्ये सध्या तरी एकमत झाल्याचे दिसत नाही.

Web Title: Swabal slogan in elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.