जिल्ह्यात २४५ गावात ‘स्वच्छता रथ’ धडकला !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:38 AM2021-02-12T04:38:55+5:302021-02-12T04:38:55+5:30
जिल्हा हगणदारीमुक्त झाला असला तरी अनेक गावांमध्ये अजूनही उघड्यावर शौचवारी सुरू आहे. घरी शौचालय असूनही बहुतांश नागरिक शौचालयाचा वापर ...
जिल्हा हगणदारीमुक्त झाला असला तरी अनेक गावांमध्ये अजूनही उघड्यावर शौचवारी सुरू आहे. घरी शौचालय असूनही बहुतांश नागरिक शौचालयाचा वापर करीत नाहीत. त्यामुळे अनेक गावे केवळ कागदावरच ‘हगणदारीमुक्त’ असल्याचे दिसून येते. स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-२ अंतर्गत शौचालयाचा वापर करणे, उघड्यावरील शौचवारी नियंत्रणात आणणे, वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन आदींबाबत नागरिकांमध्ये जाणीव जागृती करण्यासाठी जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाच्या माध्यमातून स्वच्छता रथाद्वारे गावोगावी भेटी दिल्या जात आहेत. २६ जानेवारीपासून स्वच्छता रथ गावोगावी जात असून, आतापर्यंत २४५ पेक्षा अधिक ग्रामपंचायतींमध्ये स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. सध्या हा स्वच्छता रथ मंगरुळपीर तालुक्यातील गावांमध्ये मुक्कामी असून उघड्यावर शौचास जाऊ नका, वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छतेवर भर द्यावा, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन याबाबत जनजागृती केली जात आहे.