स्वामी विवेकानंद जयंती साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:33 AM2021-01-14T04:33:55+5:302021-01-14T04:33:55+5:30
या कार्यक्रम प्रसंगी सर्वप्रथम विद्येची देवता माता सरस्वती, जिजाऊ माता, स्वामी विवेकानंद यांचे प्रतिमा पूजन सहकार भारतीचे आशिष तांबोळकर, ...
या कार्यक्रम प्रसंगी सर्वप्रथम विद्येची देवता माता सरस्वती, जिजाऊ माता, स्वामी विवेकानंद यांचे प्रतिमा पूजन सहकार भारतीचे आशिष तांबोळकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा सहकार्यवाह विजय कदम, अभाविप प्रांत वसतिगृह प्रमुख प्रशांत राठोड, नगरमंत्री गौरव साखरकर, ललित तिवारी, शशी वेलुकार, गजानन जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यासोबतच उपस्थित अभाविप कारंजा शाखेचे पदाधिकारी, सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी यांनी पूजन केले. या प्रसंगी अभाविपचे प्रसाद देशमुख यांनी स्वामी विवेकानंद आणि जिजाऊ माँसाहेब यांच्या विचारांवर प्रकाश टाकला. युवकांनी आपल्या जीवनामध्ये स्वामी विवेकानंदांचा आदर्श घेऊन राष्ट्रकार्य करावे तसेच महिलांनी जिजामातेच्या जीवनातील प्रसंगातून आदर्श स्त्री कशी असावी, यासंदर्भात विषय मांडणी केली. यानंतर श्री रा.स्व.संघाचे उमेश महितकर यांनी स्वामी विवेकानंद व माँ जिजाऊ यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. समारोप प्रसंगी विजय कदम यांनी रा.स्व.संघ व अभाविप राष्ट्रकार्यात योगदान या विषयावर चर्चा केली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कौस्तुभ मोहदरकर यांनी केले. आभार नगरमंत्री गौरव साखरकर यांनी केले. या प्रसंगी अभाविप कारंजा शाखेचे आनंद मापारी, अभिषेक काळे, योगेश चव्हाण, नेहा लोखंडे, इशा मांगवगडे, तेजस गुल्हाने, विक्की बारबोले आदी पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.