मंगरुळपीर येथे सफाई कामगारांचे काम बंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 11:25 AM2020-12-12T11:25:55+5:302020-12-12T11:29:53+5:30

Mangrulpir News सफाई कामगारांनी एल्गार पुकारला असून, ७ डिसेंबरपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे .

Sweepers strike at Mangrulpeer | मंगरुळपीर येथे सफाई कामगारांचे काम बंद आंदोलन

मंगरुळपीर येथे सफाई कामगारांचे काम बंद आंदोलन

googlenewsNext
ठळक मुद्देनोव्हेंबर २०२०पर्यंत एकूण चार महिन्यांचे देयक नगर परिषदेकडे प्रलंबित आहे.आजपर्यंत एकूण चार महिन्यांचे देयक अदा करण्यात आलेले नाहीत.

लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरुळपीर : येथील नगरपालिका सफाई कामगारांचे देयक गेली चार महिन्यांपासून थकित ठेवल्यामुळे नगरपालिका प्रशासनाविरुद्ध पालिका सफाई कामगारांनी एल्गार पुकारला असून, ७ डिसेंबरपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे .
साफसफाई कामाकरिता लागणारे मनुष्यबळ पुरविणे तसेच शहरात निघालेला कचरा वाहून नेण्याचे काम संस्थेमार्फत सुरू आहे. संस्थेने केलेल्या करारनामानुसार काम करण्याची मुदत संपली असून,  मुख्याधिकारी यांनी आदेशित करून माहे एप्रिल २०२० पासून पुढील व्यवस्था होईपर्यंत मन्युष्यबळ पुरविणे व शहरात निघालेला कचरा वाहून नेण्याचे काम करण्याचे आदेश दिलेले आहेत. आदेश देतेवेळी देयकासंदर्भात आदेशामध्ये नगर परिषदला प्राप्त झालेल्या प्रोत्साहनपत्र बक्षीस निधीमधून तसेच न. प. फंडामधून बिल देण्याबाबत करण्याचे नमुद केलेले असून, त्यानुसार संस्थेला माहे जुलै २०२०पर्यंत देयक अदा करण्यात आलेले आहे. परंतु माहे ऑगस्ट २०२० पासून ते माहे नोव्हेंबर २०२०पर्यंत एकूण चार महिन्यांचे देयक नगर परिषदेकडे प्रलंबित आहे. संस्थेनेच्या अध्यक्षाने वारंवार भेटी देऊन देयकाबाबत विनती केली असून सुद्धादेखील आजपर्यंत एकूण चार महिन्यांचे देयक अदा करण्यात आलेले नाहीत. संस्थेकडे पुढील व्यवस्था करण्याकरिता पैसे उपलब्ध नसल्यामुळे व उधारी चालू असलेले डिझेल पंपमालकाने बंद केल्यामुळे, मजुराचा पगार न दिल्यामुळे मजूर कामावर जाण्याच्या मन:स्थितीत नाही. संस्थेचे प्रलंबित चार देयके ताबडतोब अदा करण्यात यावे याकरिता संस्थेतर्फे ७ डिसेंबरपासून कामबंद सुरू आहे. या कामबंद आंदोलनामधे गाडगेबाबा संस्था पर्यवेक्षक सचिन श्रुंगारे, अनुरूप श्रुंगारे, अक्षय खरारे, अमन चरावंडे, राजू मोरे, सुशील इंगळे, भास्कर शृंगारे आदी सहभागी आहेत.

Web Title: Sweepers strike at Mangrulpeer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.