‘स्वाइन फ्लू’ने अनसिंगच्या युवकाचा मृत्यू!

By admin | Published: April 27, 2017 01:07 AM2017-04-27T01:07:17+5:302017-04-27T01:42:50+5:30

वाशिम : तालुक्यातील अनसिंग येथील एका ३५ वर्षीय युवकाचा बुधवार,२६ एप्रिल रोजी दुपारी अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयामध्ये ‘स्वाइन फ्लू’ने मृत्यू झाला.

Swine Flu Death of Unicorn | ‘स्वाइन फ्लू’ने अनसिंगच्या युवकाचा मृत्यू!

‘स्वाइन फ्लू’ने अनसिंगच्या युवकाचा मृत्यू!

Next

नागरिकांमध्ये दहशत : आरोग्य विभागाचे दुर्लक्ष

वाशिम : तालुक्यातील अनसिंग येथील एका ३५ वर्षीय युवकाचा बुधवार, २६ एप्रिल रोजी दुपारी अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयामध्ये ‘स्वाइन फ्लू’ने मृत्यू झाला. या घटनेने अनसिंग व परिसरात ‘स्वाइन फ्लू’ची दहशत निर्माण झाली आहे.
सदर युवकास २२ एप्रिल रोजी अकोला येथील आयकॉन हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. तेथून त्याला सर्वोपचार रुग्णालयात हलविण्यात आले. बुधवारी दुपारी १२ वाजता त्याचे उपचारादरम्यान निधन झाले. सदर युवक हा विवाहित असून, त्याला सहा वर्षांचा मुलगा आहे. ते दोघे देखील ‘स्वाइन फ्लू’ सदृश आजाराने त्रस्त असून, त्यांच्यावर वाशिम येथील एका खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू असल्याची माहिती आहे.
अनसिंग येथील कांता प्रदीप ठाकरे यांनाही अशाच प्रकारातील आजाराने ग्रासले होते; मात्र त्यांच्यावर अकोला येथील खासगी रुग्णालयामध्ये उपचार करण्यात आले असून, त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, आरोग्य विभागाकडे आवश्यक औषधसाठा नसल्याने रुग्णांना विविध संकटांना सामोरे जावे लागत आहे. आता तरी आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अनसिंग येथील ग्रामीण रुग्णालयात आवश्यक औषध साठा उपलब्ध करुन द्यावा, ‘स्वाइन फ्लू’ सदृश रुग्णांवर उपचार करण्यासाठी स्वतंत्र कक्ष सुरु करावा, अशी मागणी जोर धरत आहे.

रुग्णालयाचा दुजोरा
याप्रकरणी सर्वोपचार रुग्णालय प्रशासनाकडे शहानिशा केली असता, सदर युवकाचा ‘स्वाइन फ्लू’नेच मृत्यू झाल्याच्या वृत्तास दुजोरा मिळाला.

सदर आजार एच १, एन.१ विषाणूपासून उद्भवतो. या आजाराची लक्षणे ताप येणे, खोकला, हातपाय दुखणे अन श्वास घेण्यास त्रास होणे होय. अशी लक्षणे आढळल्यास ताबडतोब वैद्यकीय सल्ला घेऊन औषधोपचार करणे गरजेचे आहे. गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरल्यास योग्य.
-डॉ. अनिल कावरखे, वैद्यकीय अधिकारी , जिसारु वाशिम

Web Title: Swine Flu Death of Unicorn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.