...अन् त्याने चक्क घाेडयांवर केले डवरण, वाढता खर्च पाहता लढविली युक्ती

By नंदकिशोर नारे | Published: July 7, 2024 02:19 PM2024-07-07T14:19:13+5:302024-07-07T14:22:03+5:30

एका शेतकऱ्याने तर चक्क डवरणीसाठी स्वत: जवळ असलेल्या घाेड्याचा वापर करुन डवरणी केली व आपला खर्च वाचविला.

tactic fought in view of rising costs in washim use horse | ...अन् त्याने चक्क घाेडयांवर केले डवरण, वाढता खर्च पाहता लढविली युक्ती

...अन् त्याने चक्क घाेडयांवर केले डवरण, वाढता खर्च पाहता लढविली युक्ती

वाशिम : आधीच विविध संकटातून मार्गकरित शेतकरी करणारा शेतकरी वर्ग डवरणीला येत असलेला खर्च पाहून अनेक युक्ती लढवून डवरणी करताना दिसून येत आहे. एका शेतकऱ्याने तर चक्क डवरणीसाठी स्वत: जवळ असलेल्या घाेड्याचा वापर करुन डवरणी केली व आपला खर्च वाचविला.

रिसाेड तालुक्यातील दापुरी खुर्दनजिक वसारी येथील अल्पभूधारक शेतकरी पंढरी वाघमारे यांनी बैलांव्दारे डवरणीकरिता एकरी ८०० ते १०० रुपये येत असलेला खर्च पाहता आपल्याकडे असलेल्या घाेड्याव्दारे डवरणी करण्याचे ठरविले. कारण अनेक जण विविध क्लुप्ती लढवून डवरणी करीत आहेत. त्यांनीही चक्क घाेडयाव्दारे डवरणी केली. त्यांनी एक वर्षापूर्वी घाेडयाची खरेदी केली हाेती.

शेत डवरणीसाठी घाेडयाचा वापर हाेऊ शकताे व खर्चही वाचताे म्हणून त्यांनी हा प्रयाेग करुन पाहिला. घाेड्याव्दारे त्यांनी ४ एकरी शेती डवरणी करुन ३२०० ते ४००० रुपयांचा बचत केली आहे. त्यांनी केलेल्या या अफलातून प्रयाेगाची परिसरात जाेरदार चर्चा ही रंगत आहे.

Web Title: tactic fought in view of rising costs in washim use horse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम