घरगुती गॅसवर हॉटेलमध्ये तडका

By admin | Published: October 29, 2014 01:23 AM2014-10-29T01:23:52+5:302014-10-29T01:23:52+5:30

कारंजा तालुक्यात सर्रास वापर : महसूल अधिकार्‍यांनी लक्ष देण्याची मागणी.

Tadka in hotel gas prices | घरगुती गॅसवर हॉटेलमध्ये तडका

घरगुती गॅसवर हॉटेलमध्ये तडका

Next

कारंजा लाड (वाशिम): घरगुती वापरासाठी असलेले सिलिंडर ग्रामीण भागातील हॉटेल्स्, ढाबे येथे सर्रासपणे वापरले जात आहे. हॉटेल्स्, ढाब्यांच्या तुलनेत व्यावसायिक सिलिंडरधारकांची संख्या नगण्य असल्याची माहिती असूनही यावर महसूल व संबंधित यंत्रणेने काहीच कारवाई केली नसल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.
आहार शिजविण्यासह इतर कामांसाठी सिलिंडर ही वस्तू अत्यावश्यक म्हणून गणली जाते. घरगुती वापराबरोबरच सिलिंडरचा व्यावसायिक क्षेत्रातही वापर होत असल्याने ह्यघरगुती आणि व्यावसायिकह्ण असे सिलिंडरचे दोन प्रकार पाडण्यात आले आहेत. घरगुती वापरासाठी असलेल्या सिलिंडरची किंमत ४५0 रुपयांच्या आसपास, तर व्यावसायिक सिलिंडरची किमत १५00 रुपयांच्या आसपास आहे.
गॅसची टंचाई निर्माण होऊ नये म्हणून हॉटेल, धाबा व इतर व्यावसायिक क्षेत्रात घरगुती सिलिंडरचा वापर करण्यावर शासनाने बंदी आणली आहे. या आदेशाची पायमल्ली करणार्‍याविरुद्ध कठोर कारवाई करण्याचेही शासनाने सुचविले आहे; मात्र शहरासह ग्रामीण भागातील हॉटेल्स्, धाब्यामध्ये सर्रासपणे घरगुती सिलिंडरचाच वापर केला जात असल्याची धक्कादायक माहिती आहे. घरगुती व व्यावसासिक सिलिंडरधारकांची संख्या आणि शहर व ग्रामीण भागातील हॉटेल्स्ची संख्या यावर नजर टाकली तर घरगुती सिलिंडरचा कसा गैरवापर केला जातो हे दिसून येते.

Web Title: Tadka in hotel gas prices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.