मालेगाव येथील टायपिंग परीक्षा केंद्रात सावळागोंधळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 01:53 AM2017-08-11T01:53:41+5:302017-08-11T01:53:41+5:30

मालेगाव : मालेगाव शहरातील टायपिंग परीक्षा केंद्रावर पर्यवेक्षकाशिवाय काही टायपिंग संस्था  संचालकांचा मुक्त संचार असल्याने गोंधळ उडत आहे. या परीक्षार्थींचा पेपर अन्य काही जण सोडवित असतानाही, याकडे गटविकास अधिकारी किंवा गटशिक्षणाधिकार्‍यांच्या पथकाचे लक्ष नसल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

Tailoring Examination Center in Malegaon! | मालेगाव येथील टायपिंग परीक्षा केंद्रात सावळागोंधळ!

मालेगाव येथील टायपिंग परीक्षा केंद्रात सावळागोंधळ!

Next
ठळक मुद्देटायपिंग संस्था संचालकांचा मुक्तसंचार  

लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव : मालेगाव शहरातील टायपिंग परीक्षा केंद्रावर पर्यवेक्षकाशिवाय काही टायपिंग संस्था  संचालकांचा मुक्त संचार असल्याने गोंधळ उडत आहे. या परीक्षार्थींचा पेपर अन्य काही जण सोडवित असतानाही, याकडे गटविकास अधिकारी किंवा गटशिक्षणाधिकार्‍यांच्या पथकाचे लक्ष नसल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.
मराठी व इंग्रजी दोन्ही भाषेतील टायपिंग परीक्षेचे मालेगाव    तालुक्यात मालेगाव हे एकमेव परीक्षा केंद्र आहे. या परीक्षा केंद्रावर ५0६ परीक्षार्थी परीक्षा देत आहेत. ही परीक्षा ७ ऑगस्टपासून सुरू झाली असून, १२ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. गुरुवारी काही वर्गखोली परिसराला भेट दिली असता, काही टायपिंग संस्था चालकांचा मुक्त संचार असल्याचे दिसून आले तर काही परीक्षार्थींचे पेपर अन्य काही जण सोडवित असल्याचे परीक्षार्थींंनी सांगितले. काही वेळेस बोगस विद्यार्थीदेखील टायपिंगचा पेपर सोडविण्याची शक्यता     नाकारता येत नाही. याकडे शिक्षण विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी        सामाजिक कार्यकर्ते सेवाराम आडे यांनी केली.
दरम्यान, यासंदर्भात मालेगावचे गटशिक्षणाधिकारी शिंदे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पहिल्यांदा भ्रमणध्वनी उचलला व नंतर बंद केला. त्यानंतर वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचा भ्रमणध्वनी ‘स्विच ऑफ’ असल्याने संपर्क होऊ शकला नाही. 

या प्रकाराची माहिती घेतली जाईल. परीक्षेदरम्यान मालेगाव येथील टायपिंग परीक्षा केंद्रावर गैरप्रकार होत असतील तर मालेगावच्या गटशिक्षणाधिकार्‍यांना सूचना दिल्या जातील.  
- आर.डी. तुरणकर, शिक्षणाधिकारी (माध्य.) वाशिम

Web Title: Tailoring Examination Center in Malegaon!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.