घरकुलाचे प्रस्ताव दडपणा-या कर्मचा-याविरूद्ध कार्यवाही करा

By admin | Published: September 17, 2014 01:19 AM2014-09-17T01:19:46+5:302014-09-17T01:31:09+5:30

मानोरा गामस्थांचे गटविकास अधिका-यांना निवेदन

Take action against the employee's suppression of suppression | घरकुलाचे प्रस्ताव दडपणा-या कर्मचा-याविरूद्ध कार्यवाही करा

घरकुलाचे प्रस्ताव दडपणा-या कर्मचा-याविरूद्ध कार्यवाही करा

Next

मानोरा (वाशिम) : पंचायत समिती मानोरा अंतर्गत येणार्‍या मानोरा ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी यांना जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा वाशिम यांनी दारिद्रय रेषेखालील प्रतीक्षा यादीमधील आदिवासी समाजाला घरकुल वाटप करण्याबाबत प्रस्ताव मागितले होते. परंतु ग्रामविकास अधिकारी यांनी हेतुपुरस्परपणे आदिवासी समाजबांधवांची प्रतीक्षा यादी पाठविली नाही. त्यामुळे आदिवासी समाजावर अन्याय झाल्याचा आरोप करून ग्रामस्थांनी दोषींविरूद्ध चौकशी करून फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
पंचायत समिती मानोरा अंतर्गत ग्रामपंचायत मानोरा येथील ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी यांना जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून दारिद्रय रेषेखालील प्रतीक्षा यादीमधील आदिवासी समाजाला घरकुल वाटप करण्याकरिता प्रस्ताव बोलावले होते. परंतु मानोरा ग्रा.पं.कडून हेतुपुरस्परपणे आदिवासी समाज बांधवाची यादी पाठविली नाही. त्यामुळे आदिवासी समाजावर अन्याय झाला आहे. त्याच प्रमाणे मानोरा ग्रामपंचायतचे लिपीक मुकूंद मुरलीधर तेलकुंटे यांनी पदाचा गैरवापर करून दोन घरकुलाचा लाभ व अतवृष्टीचे महसूल विभागाकडून २४६८ रूपयाची नुकसान भरपाईचे अनुदानाचा लाभ घेतल्याचा आरोप केला आहे. चौकशी अंती दोषीविरूद्ध कडक कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Web Title: Take action against the employee's suppression of suppression

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.