शौचालयाचे छायाचित्र ‘अपलोड’ न करणाऱ्यांविरूद्ध होणार कारवाई !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 02:08 PM2018-03-26T14:08:09+5:302018-03-26T14:08:09+5:30
वाशिम - स्वच्छ भारत मिशनअंतर्गत (ग्रामीण) ३१ मार्चपर्यंत शासनाच्या संकेतस्थळावर शौचालयाचे छायाचित्र ‘अपलोड’ न करणाऱ्या ग्रामसेवक, ग्राम विकास अधिकाऱ्यांची २ एप्रिलपासून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात सुनावणी होणार आहे.
वाशिम - स्वच्छ भारत मिशनअंतर्गत (ग्रामीण) ३१ मार्चपर्यंत शासनाच्या संकेतस्थळावर शौचालयाचे छायाचित्र ‘अपलोड’ न करणाऱ्या ग्रामसेवक, ग्राम विकास अधिकाऱ्यांची २ एप्रिलपासून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात सुनावणी होणार आहे. चौकशीअंती कामचुकार कर्मचाऱ्यांविरूद्ध योग्य ती कारवाई केली जाणार आहे. ग्रामीण भाग स्वच्छ व सुंदर बनविण्याबरोबरच हगणदरीमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने गत तीन-चार वर्षांपासून विशेष मोहिम राबविली. जिल्ह्यात शौचालयाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर संबंधित शौचालयाचे छायाचित्र शासनाच्या संकेतस्थळावर अपलोड करणे बंधनकारक आहे. जिल्ह्यात एकूण १ लाख ३९ हजार ९४० शौचालयाचे छायाचित्र ‘अपलोड’ करावयाचे आहेत. २५ मार्चपर्यंत ९३ हजार ४१२ छायाचित्र अपलोड झाले असून, उर्वरीत छायाचित्र ३१ मार्चपूर्वी अपलोड करण्याच्या सूचना दीपककुमार मीणा यांनी सर्व गटविकास अधिकाºयांना दिलेल्या आहेत. कारंजा तालुक्यात छयाचित्र अपलोड करण्याचे काम ९९.२१ टक्के झाले आहे. मानोरा तालुक्यात ७२.४२ टक्के, रिसोड ६६.५० टक्के, वाशिम ६०.४९ टक्के, मालेगाव ५६.०२ टक्के तर मंगरूळपीर तालुक्यात ५५.२२ टक्के शौचालयाचे छायाचित्र ‘अपलोड’ करण्यात आले आहेत. ३१ मार्चपर्यंत शौचालयाचे सर्व छायाचित्र अपलोड करावे अन्यथा कारवाई करण्याचा इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा यांनी दिला. त्या अनुषंगाने सर्व गटविकास अधिकाºयांनी ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाºयांना छायाचित्र अपलोड करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. ३१ मार्चपूर्वी छायाचित्र अपलोड न करणाºया ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाºयांची मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या दालनात सुनावणी होणार आहे.