जादा दराने बियाणे विक्री करणाऱ्या दोषीवर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:30 AM2021-06-06T04:30:28+5:302021-06-06T04:30:28+5:30
मंगरुळपीर... मंगरुळपीर तालुक्यात बहुतांश व्यापारी हे अवैध मार्गाचा अवलंब करून बियाणांची जादा दराने विक्री करीत आहेत. अशा प्रकारे शेतकऱ्यांची ...
मंगरुळपीर... मंगरुळपीर तालुक्यात बहुतांश व्यापारी हे अवैध मार्गाचा अवलंब करून बियाणांची जादा दराने विक्री करीत आहेत. अशा प्रकारे शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करणे अयोग्य असून शेतकऱ्यांना जादा दराने बियाणे विक्री करणाऱ्या दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी सरपंच संघटनेचे वाशिम जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाकधने यांनी केली आहे.
गत दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अनेकदा कडक निर्बंधामुळे ग्राहक न मिळाल्यामुळे भाजीपाला रस्त्यावर फेकून द्यावा लागला. त्यामुळे प्रचंड आर्थिक नुकसान झाले होते. अशा विपरीत परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी त्याची आर्थिक पिळवणूक होत असेल तर ही बाब अशोभनीय व नियमाचे उल्लंघन करणारी आहे. सद्य:स्थितीत शेतकरी खरीप हंगामाचे नियोजन करीत आहे. यामध्ये कर्ज काढून पैशाची जुळवाजुळव करीत आहे, ही जुळवाजुळव करीत असताना अनेक संकटांशी सामोरे जावे लागत आहे. अशा पद्धतीने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक होत असेल तर बियाणे विक्रेत्यांवर कारवाई करावी, अशी मागणी सरपंच संघटना जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाकधने यांनी केली आहे.