कोरोना लस घ्या, दाढी-कटिंग मोफत; रिसाेड शहरातील सलून व्यावसायिकाचा अभिनव उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 11:03 AM2021-06-21T11:03:52+5:302021-06-21T11:03:59+5:30

Risod News : रिसाेड शहरातील एका सलून व्यावसायिकाने चक्क लस घ्या, दाढी कटींग माेफत हा उपक्रम राबविला.

Take the corona vaccine, beard-cutting free; Innovative venture of a salon professional in the city of Resad | कोरोना लस घ्या, दाढी-कटिंग मोफत; रिसाेड शहरातील सलून व्यावसायिकाचा अभिनव उपक्रम

कोरोना लस घ्या, दाढी-कटिंग मोफत; रिसाेड शहरातील सलून व्यावसायिकाचा अभिनव उपक्रम

Next

- नंदकिशाेर नारे

वाशिम : काेराेना संसर्ग राेखायचा असेल तर त्यावर एकमेव उपाय म्हणजे लसिकरण. याकरिता रिसाेड शहरातील एका सलून व्यावसायिकाने चक्क लस घ्या, दाढी कटींग माेफत हा उपक्रम राबविला. त्याच्या या उपक्रमाचे सर्वत्र काैतूक हाेत असून त्याचे नाव आहे रामकृष्ण काेकाटे.

रिसाेड शहरात समता फांउडेशनच्यावतिने शहरातील नागरिकांचे माेफत लसिकरण केल्या जात आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी लसिकरण करावे याकरिता हा उपक्रम राबविण्यात आला असल्याचे रामकृष्ण काेकाटे यांचे म्हणणे आहे.  याकरिता त्यांना मानवता प्रतिष्ठानचे माेलाचे सहकार्य लाभले.

लसीकरण करून घेण्यासाठी या सलून चालकाने घेतलेल्या पुढाकाराचे सर्वत्र काैतूक हाेत आहे.
 कोरोना विषाणू संसर्गामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा सलून, पार्लर व्यावसायिकांनाही फटका बसला आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी लस घेणं आवश्यक आहे. लस घेणं गेरजेचं असतानाही काही लोक लस घेत नाहीत. त्यांच्यामध्ये जागृती करण्यासाठी  मोफत दाढी आणि मोफत कटिंगची योजना रामकृष्ण यांनी राबविली असून रिसोड शहरातील कोरोना लस  डोस घेतलेल्या व्यक्तींसाठी ती आहे.याकरिता त्यांना मानवता प्रतिष्ठान सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवि अंभोरे , उपाध्यक्ष काशीनाथ कोकाटे आदिंचे सहकार्य लाभत आहे.
 
रिसाेड शहरात समता फांऊडेशनतर्फे राबविण्यात येत असलेल्या माेफत काेराेना लसिकरणाला प्रतिसाद मिळावा, नागरिकांचे जास्तीत जास्त लसिकरण हाेऊन काेराेना हद्दपार व्हावा याकरिता हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
... रामकृष्ण काेकाटे
रिसाेड

Web Title: Take the corona vaccine, beard-cutting free; Innovative venture of a salon professional in the city of Resad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.