मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी उपाययोजना करा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:37 AM2021-01-22T04:37:15+5:302021-01-22T04:37:15+5:30
यावेळी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, उपवनसंरक्षक सुमंत सोळंके यांची ...
यावेळी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, उपवनसंरक्षक सुमंत सोळंके यांची प्रमुख उपस्थिती होती. वनमंत्री संजय राठोड म्हणाले की, वन्यजीव शेती अथवा नागरी वस्तीमध्ये आल्याने मानव आणि वन्यजीव यांचा संघर्ष होतो. त्यामुळे हा संघर्ष टाळण्यासाठी वन क्षेत्रात विविध उपाययोजना कराव्यात. तसेच मृदसंधारणासोबतच जमिनीतील पाणी पातळी वाढावी, यासाठी वन क्षेत्रामध्ये जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने वन विभागाने नियोजन करून आगामी काळात जलसंधारणाच्या कामाचे प्रमाण वाढवावे. त्याचबरोबर वन विभागामार्फत कुरण विकास कार्यक्रमसुद्धा राबविण्यात येणार असून, त्याचा आराखडा तयार करून मंजुरीसाठी सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. जिल्ह्यातील कोरोना विषाणू संसर्ग सद्यस्थिती, लसीकरण मोहीम, कायदा व सुव्यवस्था आदी विषयांचाही ना. राठोड यांनी यावेळी आढावा घेतला.
सोहळ अभयारण्य परिसरातील भूसंपादनाचा विषय मार्गी लावणार
कारंजा तालुक्यातील सोहळ अभयारण्य क्षेत्रालगत काही शेतकऱ्यांची जमीन असून या जमिनीच्या आजूबाजूने अभयारण्य आहे. ही खासगी जमीन संपादित करून घेण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. त्यानुसार सदर जमिनीचे भूसंपादन करून घेण्याबाबतचा प्रस्ताव तातडीने सादर करावा. मंत्रालयस्तरावर सदर प्रस्तावाला तातडीने मंजुरी देऊन शेतकऱ्यांना त्याचा मोबदला देण्याची कार्यवाही गतीने केली जाईल, असेही राठोड यावेळी म्हणाले.