कोरोनापासून बचावासाठी आवश्यक खबरदारी घ्या !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:40 AM2021-02-10T04:40:25+5:302021-02-10T04:40:25+5:30
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य ...
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) रमेश तांगडे, जिल्हा प्रशासन अधिकारी दीपक मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. म्हणाले, कोरोना विषाणू संसर्ग अद्याप पूर्णत: संपलेला नाही. आपल्या आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे आपण गाफील न राहता कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. नागरिकांनी मास्कचा वापर तसेच सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे. कोरोना संसर्गाची कोणतीही लक्षणे दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता अथवा मनात कोणतीही भीती न बाळगता कोरोना चाचणी करून घ्यावी. गर्दी होणाऱ्या ठिकाणी, बाजारपेठेमध्ये कोरोना चाचणीसाठी विशेष कॅम्प घेण्याच्या सूचना आरोग्य विभागाला देण्यात आल्या आहेत. लोकांशी सातत्याने संपर्क येणाऱ्या व्यक्तींनी या कॅम्पमध्ये आपली कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले.