मानधनाकरीता तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांचे निवडणूक अधिकाऱ्यांना साकडे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 02:18 PM2019-03-23T14:18:18+5:302019-03-23T14:18:25+5:30

मानधनासाठी निधी तसेच लिखित स्वरूपात नियुक्ती आदेश देण्याची मागणी मुख्य निवडणूक अधिकाºयांकडे केली आहे, अशी माहिती तलाठी, मंडळ अधिकारी समन्वय महासंघाचे राज्याध्यक्ष तथा वाशिमचे मंडळ अधिकारी श्याम जोशी यांनी दिली.

Talathi, BMC officials demand to honorarium! | मानधनाकरीता तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांचे निवडणूक अधिकाऱ्यांना साकडे !

मानधनाकरीता तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांचे निवडणूक अधिकाऱ्यांना साकडे !

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : निवडणूकविषयक कामकाजाच्या अनुषंगाने तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे; परंतु अनेक ठिकाणी मानधनासाठी निधीची मागणी नोंदविली नाही, तसेच काही कर्मचाºयांना लिखित स्वरूपात नियुक्ती आदेश दिले नसल्याची बाब तलाठी, मंडळ अधिकारी समन्वय महासंघाने मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या निदर्शनात आणून दिली आहे. मानधनासाठी निधी तसेच लिखित स्वरूपात नियुक्ती आदेश देण्याची मागणी मुख्य निवडणूक अधिकाºयांकडे केली आहे, अशी माहिती तलाठी, मंडळ अधिकारी समन्वय महासंघाचे राज्याध्यक्ष तथा वाशिमचे मंडळ अधिकारी श्याम जोशी यांनी दिली.
लोकसभा निवडणुकनिषयक कामकाज करण्यासाठी पर्यवेक्षक म्हणून तलाठी, मंडळ अधिकाºयांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पर्यवेक्षकांना मानधन व प्रवासभत्ता देय असून, यासंदर्भात तलाठी, मंडळ अधिकारी समन्वय महासंघाने राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला असता, काही बाबी समोर आल्या आहेत. त्यानुसार राज्यामध्ये मनुष्यबळाची उपलब्धता व कामाची सोय या दृष्टिने पर्यवेक्षक या पदावर बहुतेक ठिकाणी मंडळ अधिकारी व तलाठी संवर्गातील कर्मचाºयांची नियुक्ती केली आहे; परंतु अद्याप काही जिल्हा निवडणूक अधिकाºयांनी लिखित स्वरुपात, तसे आदेश पारित केले नाहीत. पर्यवेक्षकांच्या देय मानधनासाठी निधीची मागणी नोंदविलेली नाही. त्यामुळे लिखीत आदेश देण्यात यावे तसेच मानधनासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य तलाठी, पटवारी, मंडळ अधिकारी समन्वय महासंघाने मुख्य निवडणूक अधिकाºयांना साकडे घातले आहे.
 
पर्यवेक्षक या पदावर बहुतेक ठिकाणी मंडळ अधिकारी व तलाठी संवगार्तील कर्मचाºयांची नियुक्ती केली आहे. परंतू, अद्याप काही जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी लिखित स्वरुपात तसे आदेश पारित केले नाहीत. काही ठिकाणी पर्यवेक्षकांच्या देय मानधनाकरीता निधीची मागणी नोंदविलेली नाही. ही बाब निवेदनाद्वारे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या निदर्शनात आणून दिली आहे. न्याय मिळेल, अशी अपेक्षा आहे.
- श्याम जोशी
अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य तलाठी, पटवारी, मंडळ अधिकारी समन्वय महासंघ.

Web Title: Talathi, BMC officials demand to honorarium!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम