वाशिम तालुक्यात हजारावर विद्यार्थी गुणवत्ता यादीत
By admin | Published: June 14, 2017 02:40 AM2017-06-14T02:40:58+5:302017-06-14T02:40:58+5:30
वाशिम तालुक्याचा निकाल ८७.९८ टक्के लागला. तालुक्यातून परिक्षेसाठी ५ हजार १४६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी ५ हजार ७६ विद्यार्थी परीक्षेला बसले आणि ४ हजार ४६६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे मार्च २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवार १३ जून रोजी जाहीर करण्यात आला. यामध्ये वाशिम तालुक्याचा निकाल ८७.९८ टक्के लागला. तालुक्यातून परिक्षेसाठी ५ हजार १४६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी ५ हजार ७६ विद्यार्थी परीक्षेला बसले आणि ४ हजार ४६६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये १ हजार १३६ विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळविले. तालुुक्यातील सहा शाळांचा निकाल शंभर टक्के लागला.
वाशिम तालुक्यातील बाकलीवाल विद्यालय वाशिम ८५.४१, राणी लक्ष्मीबाई कन्या शाळा वाशिम ९३.७५, नगर परिषद एम. जी. विद्यालय वाशिम ७४.०७, श्री शिवाजी हायस्कूल वाशिम ९०.७१, जि.प. हायस्कूल वाशिम ५८.४५, मुलीबाई चरखा इंग्लिश हायस्कूल वाशिम १००, रेखाताई राष्ट्रीय विद्यालय वाशिम ६६.४१, परमवीर अब्दुल हमीद उर्दू विद्यालय वाशिम ९२.८५, राधादेवी बाकलीवाल कन्या विद्यानिकेतन वाशिम ९८.०३, लक्ष्मीनारायण इन्नानी हायस्कूल वाशिम ५०.००, मालतीबाई सरनाईक कन्या विद्यालय वाशिम ८७.०९, अयोध्यादेवी इन्नानी इंग्लिश स्कूल वाशिम ८८.८८, प. दि. जैन विद्यालय अनसिंंग ७९.०४, जिजामाता विद्यामंदिर अनसिंग ७३.७२, मौलाना आझाद उर्दू हायस्कूल अनसिंंग ९५.३१, श्रीकृष्ण विद्यालय तोंडगाव ९३.९७, श्री हनुमान विद्यालय उकळीपेन ८६.२७, श्री राजेश्वर विद्यालय वांगी ८६.३६, विठाबाई पारसकर विद्यामंदीर केकतउमरा ८१.२९, नागसेन विद्यालय आडोळी ४१.६६, स्वामी विवेकानंद विद्यालय कोकलगाव ९२.५१, श्री पारेश्वर विद्यालय पार्डी टकमोर ९६.१३, श्री विठ्ठल विद्यालय पार्डी आसरा ८६.७६, संत ज्ञानेश्वर टेक्निकल विद्यालय कळंबा महाली ८४.३१, यशवंतराव चव्हाण विद्यालय काजळांबा ९४.०७, स्व. काशीरामजी चौधरी विद्यालय माळेगाव (भटउमरा) ९०.००, श्री लाल बहादूर शास्त्री विद्यालय काटा ९०.६७ टक्के, डॉ. पंजाबराव देशमुख विद्यालय तांदळी हिवरा ८४.०९, शिंदे गुरुजी विद्यामंदीर वार्ला ९५.३८, ओंकारेश्वर विद्यालय जयपूर ८८.८८, विदर्भ विद्यालय पिंपळगाव ९५.३४, श्रीराम चरणदास बाबाविद्यालय फाळेगाव (थेट) ९०.८०, स्व. नामदेवराव राजगुरू विद्यालय धुमका (बोराळा) ८८.८८, संस्कार साधना विद्यामंदिर अनसिंग वाशिम ९६.९६, श्री गजानन महाराज विद्यालय सावरगाव जिरे ८४.४८, ज्ञानराज माउली विद्यालय तोरणाळा जोडगव्हाण ९४.३८, छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय राजगाव ७८.३७, गजानन महाराज विद्यालय बाभुळगाव ८०.६४, हाजी बद्रोद्दीन बेनीवाले उर्दू हायस्कूल वाशिम ९५.७१, शरद पवार माध्यमिक विद्यालय सुपखेला ८६.७९, श्री विठ्ठल विद्यालय तामसी ९२.००, राजमाता जिजाऊ विद्यामंदिर तामसी ९०.३२, बिरुजी पाटील (मस्के ) विद्यामंदिर वाई ९३.८२, काशीरामजी पाटील विद्यालय सुपखेला ९२.९८, जागेश्वर विद्यालय कार्ली ८१. ४८, श्री रघुनाथ स्वामी विद्यालय सोयता १०० टक्के, विवेकानंद विद्यालय वारा जहागीर ९४.३३ टक्के, सुशिलाबाई जाधव विद्यानिकेतन लाखाळा ९६.०७, राजीव गांधी विद्यालय ज्ञानेश्वर नगर वाशिम ३५.००, गौरीशंकर माध्यमिक विद्यालय वाशिम १०० टक्के, ज्ञानेश्वर माउली विद्यालय कोंडाळा १०० टक्के, लॉयन्स विद्यानिकेतन माध्यमिक विद्यालय वाशिम ९३.९३, नालंदा एससी केंद्रीय आश्रम शाळा आडोळी ६३.६३, यशवंतराव चव्हाण सरनाईक शाळा सुपखेला ९८.३६, शांतीनिकेतन इंग्लिश हायस्कूल वाशिम १००, माउंट कारमेल इंग्लिश स्कूल सुरकुंडी बु. १०० टक्के, मैनागिरी महाराज विद्यालय टो-जूमडा ८६.०७, हौसाजी काटेकर माध्यमिक शाळा एकांबा ९७.६७, संत ज्ञानेश्वर विद्यालय आसोला जहागीर ९३.०२ टक्के, मो. आझाद उर्दू हायस्कूल वाशिम ९४.४४ टक्के, शासकीय मागासवर्गीय मुलींची वसतिगृह शाळा सुरकुंडी ९६.८७ टक्के, नारायण माध्यमिक व उच्च माध्य शाळा वाशिम ७३.१७ टक्के, अशी शाळांच्या निकालाची टक्केवारी आहे.