बसफेऱ्यांसंदर्भात भाजपा पदाधिकाऱ्यांची परिवहन मंत्र्यांशी चर्चा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 03:39 PM2019-01-22T15:39:05+5:302019-01-22T15:40:00+5:30
वाशिम : वाशिम, रिसोड येथून अन्य ठिकाणी नवीन बसफेऱ्या सुरू करण्यासंदर्भात भाजपा पदाधिकाऱ्यांनी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याशी २२ जानेवारी रोजी चर्चा करीत निवेदन दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : वाशिम, रिसोड येथून अन्य ठिकाणी नवीन बसफेऱ्या सुरू करण्यासंदर्भात भाजपा पदाधिकाऱ्यांनी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याशी २२ जानेवारी रोजी चर्चा करीत निवेदन दिले. या निवेदनानुसार पुढील कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन रावते यांनी दिले.
जिल्ह्यातील प्रवाशांना बुलडाणा, यवतमाळ, हिंगोली व अन्य ठिकाणी बसने प्रवास करण्यासाठी योग्य त्या प्रमाणात बसफेऱ्या असणे आवश्यक आहे. रिसोड व वाशिम आगारातून पुरेशा प्रमाणात बसफेऱ्या नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. प्रवाशांची गैरसोय दूर करण्याच्या दृष्टिकोनातून भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष लखनसिंह ठाकूर यांनी २२ जानेवारी रोजी राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची मंत्रालयात भेट घेत बसफेºयासंदर्भात चर्चा केली. कारंजामार्गे रिसोड ते यवतमाळ, पुसद मार्गे रिसोड ते यवतमाळ, लोणार,रिसोड मार्गे पुसद ते पुणे तसेच कळमनुरी, हिंगोली, सेनगाव मार्गे उमरखेड ते शेगाव, रिसोड मार्गे पांढरकवडा ते पुणे आणि मानोरा, पोहरादेवी रिसोड मार्गे लोणार ते दिग्रस अशा सात नवीन बसफेऱ्या सुरू करण्याची आग्रही मागणी यावेळी ना. रावते यांच्याकडे करण्यात आली. या बसफेऱ्या सुरू झाल्या तर महामंडळाच्या उत्पन्नातदेखील वाढ होईल, अशी अपेक्षाही व्यक्त केली. निवेदनानुसार पुढील कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन ना. रावते यांनी दिल्याची माहिती लखनसिंह ठाकूर यांनी दिली. यावेळी भाजपा ओबीसी सेलचे जिल्हा सरचिटणीस सुनील बेलोकर, देवीदास नागरे, नंदकिशोर मगर, विठ्ठलराव अवचार आदींची उपस्थिती होती.