गुड बोला,गोड बोला अन माणसे जुळवा - खासदार भावना गवळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 02:06 PM2019-01-19T14:06:17+5:302019-01-19T14:06:24+5:30
शब्द हा ‘बाण’ आहे, ते जपून व चांगले वापरणे गरजेचे आहे. एखाद्या अपघातात जखमी झालेल्यावर उपचार केल्यास तो बरा होवू शकतो. परंतु शब्दबाणाने दुखावलेल्यातून खूप वाईट परिणाम होतात.
शब्द हा ‘बाण’ आहे, ते जपून व चांगले वापरणे गरजेचे आहे. एखाद्या अपघातात जखमी झालेल्यावर उपचार केल्यास तो बरा होवू शकतो. परंतु शब्दबाणाने दुखावलेल्यातून खूप वाईट परिणाम होतात. यातून माणसे दुरावतात ते कधी न जुळण्यासाठी. त्याकरिता जीवनात माणसाने नेहमी गुड बोला, गोड बोला व माणसे जुळवा. तुमच्या बोलण्यावरुन तुमच्यातील स्वभाव, गुण, दोष दिसून येतात. गोड बोलता आले नाही तर चालेल पण गुड बोला, यामुळे समाजात तुमचे एक वजन, मानसन्मान होवून तुमच्याशी सर्व जण जुळून राहतील. मी लोकप्रतिनिधी असल्याने दररोज शेकडो जणांसोबत वावरते, अनेकजण समस्या घेवून येतात. तेव्हा त्यांना दोन शब्द प्रेमाचे, जिव्हाळयाचे बोलल्या गेले तर त्यांना त्यांचे काम झाले, नाही झाले याचे दु:ख नसते, तर ताईंनी माझी आस्थेने चौकशी केली याचा आनंद अधिक असतो. ही ताकद गुड व गोड बोलण्यात आहे. गुड व गोड बोलतांना कोणी आपल्यामुळे दुखावणार नाही याची खात्री असते त्यामुळे सर्वांनी खरंच गुड बोला, गोड बोला, सारं गोडचं होईल.
शब्द हा बाण आहे. याचा आपण कसा वापर करतो यावर तुमचे व्यक्तिमत्व दिसून येते. शब्दांचा वापर बोलतांना गुड व गोड केला की माणसे जुळतात. त्यासाठी प्रत्येकाने गुड बोला व गोड बोला याचा सकारात्मक परिणाम आपणास आपल्या जीवनात जाणवणार यात दुमत नाही.
मी ‘लोकमत’चे विशेष आभार मानते, की त्यांनी वाचकांना ‘गूड बोला, गोड बोला’ असा संकल्प करण्यासाठी पुढाकार घेतला.