पाटणच्या तालुका कृषि अधिकाऱ्यांना मारहाणीचा वाशिममध्ये निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2018 01:51 PM2018-09-02T13:51:48+5:302018-09-02T13:52:28+5:30
या घटनेचा जिल्ह्यातील कृषि विभागातील अधिकाऱ्यांनी १ सप्टेंबर रोजी निषेध नोंदवून दोषींवर कारवाईची मागणी केली.
दोषींवर कारवाईची मागणी : न्याय न मिळाल्यास असहकार आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : पाटणी (जि.सातारा) येथील तालुका कृषि अधिकारी प्रविण आवटे यांना मल्हारपेठ येथे शेतकरी प्रशिक्षणाचा कार्यक्रम सुरू असताना विक्रमबाबा पाटणकर नामक पदाधिकाऱ्याने मारहाण केली. या घटनेचा जिल्ह्यातील कृषि विभागातील अधिकाऱ्यांनी १ सप्टेंबर रोजी निषेध नोंदवून दोषींवर कारवाईची मागणी केली.
यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे, की शासकीय कर्तव्य बजावत असताना चुकीच्या प्रवृत्तीमुळे शासकीय कामकाजात अडथळा निमाृण होवून शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण होत आहे.
कृषि विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर सद्या ओढवलेला कामाचा अतिरिक्त ताण, अपूरे मनुष्यबळ, असामाजिक तत्वांचा दबाव आदी कारणांमुळे त्यांचे मनोधैर्य खचत आहे. यावर प्रभावी तोडगा निघावा, यासाठी तातडीची पाऊले उचलावी. पाटणच्या घटनेस कारणीभूत व्यक्तीवर विनाविलंब गुन्हा दाखल करून अशा प्रवृत्तीस आळा घालावा, अशी मागणी करण्यात आली.