पाणीटंचाईग्रत गावातील टँकरची ‘व्हॉटसअ‍ॅप’ ग्रुपवर नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 01:44 PM2019-05-27T13:44:10+5:302019-05-27T13:44:15+5:30

आता दर दिवशी टँकरची संपूर्ण माहिती पंचायत समितीस्तरावर अद्ययावत ठेवण्यात येणार आहे.

Tanker's record Now on 'Whats app' group | पाणीटंचाईग्रत गावातील टँकरची ‘व्हॉटसअ‍ॅप’ ग्रुपवर नोंद

पाणीटंचाईग्रत गावातील टँकरची ‘व्हॉटसअ‍ॅप’ ग्रुपवर नोंद

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : राज्यातील पाणीटंचाईग्रस्त गावांत टँंकर मंजूर होऊनही पाणी पुरवठयात अनियमितता होत असत्याच्या तक्रारी करण्यात येत आहेत. याची दखल शासनाने घेतली असून, आता दर दिवशी टँकरची संपूर्ण माहिती पंचायत समितीस्तरावर अद्ययावत ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी व्हॉटसअ‍ॅप ग्रुप तयार करण्यात आले असून, टँकरच्या लॉग बुकवरील संपूर्ण माहिती गाव पातळीवरील पंचायत समितीस्तरावर पडताळण्यात येणार आहे. राज्य शासनाने २३ मे रोजीच्या परिपत्रकाद्वारे याबाबत सुचना दिल्या आहेत.
राज्य शासनाच्या २४ जानेवारी २००६ व्या परिपत्रकानुसार पाणीटंचाईग्रस्त गावांत टँकरने पाणी पुरवठा करण्यात येतो. या गांवात प्रत्यक्षात किती पाणी पुरवठा होतो, हे पाहणे आवश्यक असल्याने संबंधित गावाला टँकर उपलब्ध करून दिल्यानंतर वेळोवेळी टँकर पोहोचल्याबाबत, टँकरच्या क्षमतेबाबत आणि नियोजित खेपांबाबत संबंधित गावातील पाणी पुरवठा समितीने नामनिर्देशित केलेल्या समितीवरील २ महिला सदस्यांची स्वाक्षरी घेण्यात येते, तसेच टँकर गावात पोहोचल्याची तारिख व वेळ नोंद करण्याच्या सुचनाही दिल्या आहेत. आता या सुचनांचे पालन करताना गावातील २ महिला सदस्यांच्या स्वाक्षऱ्या टँकरचालकाकडील लॉगबुकवर प्रत्येक खेपेच्यावेळीच घेण्याचे सुचित करण्यात आले असून, यात अनियिमतता दिसल्यास खेपा पूर्ण के ल्याचे ग्राह्य धरण्यात येणार नसून, महिला सदस्यांच्या स्वाक्षरीसह लॉगबुकच्या नोंदी व्हॉटसअ‍ॅपद्वारे पंचायत समितीस्तरावर केलेल्या व्हॉटसअ‍ॅप ग्रुपवर टाकाव्या लागणार आहेत. त्यामुळे महिला सदस्यांच्या स्वाक्षरीसाठी प्रत्येक वेळी लॉगबुक टँकरसोबतच ठेवावे लागणार असून, याची नियमित वा आकस्मिक पडताळणीही केली जाणार आहे. टँकर मंजुरीचे आदेश व टँकरची क्षमता प्रमाणित केलेल्या आदेशाची प्रत लॉगबुकवर चिकटवावी लागणार असून, यावर संबंधित वाहनाचा नोंदणी क्रमांक प्रत्येक पानावर नमुद करावा लागणार आहे.

Web Title: Tanker's record Now on 'Whats app' group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.