तंटामुक्त समिती अध्यक्ष निवडण्यासाठीच झाला ‘तंटा’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 01:45 AM2017-10-25T01:45:05+5:302017-10-25T01:48:14+5:30
तंटामुक्त गाव समितीचा अध्यक्ष निवडण्यासाठी बोलाविण्यात आलेल्या ग्रामसभेतच तंटा व हाणामारी झाल्याची घटना तालुक्यातील सोयजना येथे २४ ऑक्टोबर रोजी घडली. परस्पराच्या तक्रारीवरून दोन्ही गटाच्या तब्बल २५ जणांविरुद्ध मानोरा पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले. त्यात एका महिला पदाधिकार्याचा नवनिर्वाचित सरपंचांनी विनयभंग केल्याचा आरोप ठेवण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा: तंटामुक्त गाव समितीचा अध्यक्ष निवडण्यासाठी बोलाविण्यात आलेल्या ग्रामसभेतच तंटा व हाणामारी झाल्याची घटना तालुक्यातील सोयजना येथे २४ ऑक्टोबर रोजी घडली. परस्पराच्या तक्रारीवरून दोन्ही गटाच्या तब्बल २५ जणांविरुद्ध मानोरा पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले. त्यात एका महिला पदाधिकार्याचा नवनिर्वाचित सरपंचांनी विनयभंग केल्याचा आरोप ठेवण्यात आला.
सोयजना येथे तंटामुक्तीच्या अध्यक्ष निवडीसाठी ग्रामसभेचे आयोजन केले होते. अध्यक्ष निवडीवरून हाणामारी झाली. प्रथम फिर्यादी सचिन हरिदास राठोड (२३) रा. सोयजना याने पोलिसात दिलेल्या तक्रारीत असे म्हटले की, मी सकाळी ९ वाजतादरम्यान ग्रामसभेला जात असताना नमूद आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून रस्ता अडवून मारहाण व शिवीगाळ केली. या फिर्यादीवरून आरोपी अमित रोहीदास चव्हाण, संदीप ज्ञानेश्वर चव्हाण, मनोहर ज्ञानेश्वर चव्हाण, अजय युवराज चव्हाण, संकेत दशरथ चव्हाण, सुजीत दशरथ चव्हाण, नितीन नामदेव चव्हाण, वासुदेव रामहरी चव्हाण, खुशाल पितांबर चव्हाण, रुपेश आत्माराम चव्हाण, नीलेश आत्माराम चव्हाण, शालीक रेाहीदास चव्हाण, संजय चक्रू चव्हाण, अश्विन दिलीप चव्हाण, रवींद्र दगडू राठोड व सचिन रोहीदास चव्हाण यांच्याविरुद्ध कलम १४३, १४५, ३२३, ३४१, ५0४, ५0६ भादंवि अन्वये गुन्हे दाखल केले तर सोयजना येथील एका महिला पदाधिकार्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, सकाळी ९ वाजता ग्रामपंचायततर्फे ग्रामसभेचे आयोजन केले होते. सभेच्या आवश्यक कोरम पूर्ण झाल्यानंतर सुरुवात झाली; परंतु वाद झाल्याने सभा तहकूब करण्यात आली. नंतर मी घरी परत जाताना आरोपी विनोद नारायण चव्हाण, अण्णा लक्ष्मण मिसाळ, दीपक किसन कोल्हे, तुळशिराम मेराम राठोड, श्यामराव राठोड, नेमीचंद चव्हाण, शंकर लक्ष्मण कोल्हे, विनोद धर्मा चव्हाण, किरण अण्णा मिसाळ यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून विनयभंग करीत अश्लील शिवीगाळ केली. या फिर्यादीवरून उपरोक्त आरोपीविरुद्ध कलम १४३, १४५, ३४१, २९४, ३५४, ५0४, ५0६ भादंवि अन्वये गुन्हे दाखल केले. यातील विनोद नारायण चव्हाण हे नवनिर्वाचित सरपंच आहेत. प्रकरणाचा तपास ठाणेदार रामकृष्ण मळघने यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार विजय जाधव, दिगांबर राठोड करीत आहे.
-