वाशिम जिल्ह्यात यंदा ४.१५ लाख हेक्टरवर खरीप पेरणीचे उद्दिष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 04:08 PM2019-04-13T16:08:19+5:302019-04-13T16:09:56+5:30
वाशिम: यंदाच्या खरीप हंगामाची तयारी जिल्हा कृषी विभागाने केली असून, ४.१५ लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणीचे नियोजन केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: यंदाच्या खरीप हंगामाची तयारी जिल्हा कृषी विभागाने केली असून, ४.१५ लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणीचे नियोजन केले आहे. यंदा पीक उत्पादकता वाढविण्यावर कृषी विभागाकडून विशेष भर दिला जाणार आहे. त्याशिवाय शेतकºयांसाठी अनुदानित बियाणे व खतांचेही नियोजन करण्यात आले आहे.
कृषी विभागाने यंदाच्या खरीप हंगामाच्या तयारीसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाºयांच्या प्रमुख उपस्थितीत खरीप आढावा बैठकीचे आयोजन केले होते. त्यात पीककर्ज वाटप, फळबाग लागवडीचे प्रलंबित अनुदान, उडिद, मुगाच्या उत्पादकतेत झालेली वाढ, बियाण्यांची उगवण क्षमता, खतांचे नियोजन, कृषीपंप जोडण्या आदि मुद्यांवर चर्चा करतानाच खरीप पीक पेरणीचे उद्दिष्ट ठरविण्यात आले. वाशिम जिल्ह्यात खरीपाचे क्षेत्र सरासरी ४ लाख ६९६ हेक्टर असताना, गतवर्षी जिल्ह्यात ३ लाख ९४ हजार ७११ हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी झाली होती. आता यंदाच्या हंगामासाठी कृषी विभागाने ४ लाख १५ हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. त्यात नेहमीप्रमाणे सोयाबीनचे क्षेत्र सर्वाधिक २ लाख ९० हजार हेक्टर, तुरीचे क्षेत्र ६० हजार हेक्टर, कपाशीचे क्षेत्र २५ हजार हेक्टर, मुंगाचे क्षेत्र १५ हजार हेक्टर, उडिदाचे क्षेत्र २० हजार हेक्टर, ज्वारीचे क्षेत्र ४ हजार हेक्टर, तिळाचे ३०० हेक्टर आणि इतर खरीप पिकांचे क्षेत्र ७०० हेक्टर आहे. यंदाच्या हंगामात पीक उत्पादकता वाढविण्यासाठी कृषी विभाग विशेष प्रयत्न करणार असून, या अंतर्गत शेतीशाळांचे मोठ्या प्रमाणात आयोजन करून पीक उत्पादन पद्धती व पीक संरक्षण पद्धतीच्या तंत्रज्ञानाचा प्रसार केला जाणार आहे. सोयाबीनच्या पिकात ९५ टक्के क्षेत्रात आंतरपिक म्हणून तुरीची पेरणी करण्यासाठी शेतकºयांना प्रोत्साहित केले जाणार आहे. यंदा सोयाबीनच्या क्षेत्रात १४ हजार ७४२ हेक्टर, तर तुरीच्या क्षेत्रात ७९८० हेक्टरची वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे.
कपाशीच्या क्षेत्रात घट
कृषी विभागाने यंदा खरीप हंगामाचे नियोजन करताना कपाशी आणि ज्वारी या पिकांच्या पेरणीचे उद्दिष्ट कमी केले आहे. जिल्ह्यात कपाशीचे सरासरी क्षेत्र २९ हजार ७०१ हेक्टर असताना यंदा केवळ २५ हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशीचे, तर वन्यप्राण्यांमुळे ज्वारीच्या पेरणीवर मयार्दा येत असल्याने या पिकाचे क्षेत्र ११६४२ हेक्टर असताना केवळ ४ हजार हेक्टर उद्दिष्ट ठेवले आहे