तरूण क्रांती स्वाभिमान यात्रा हरिद्वारला रवाना; आत्महत्याग्रस्त १०१ कुटूंबांची घेणार भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 02:07 PM2018-08-08T14:07:09+5:302018-08-08T14:07:47+5:30
वाशिम : वाशिम ते हरिव्दारदरम्यान १०१ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबांची भेट घेवून त्यांना मदत करणे, ‘बेटी बचाव बेटी पढाव’ उपक्रमांतर्गत काही मुलींना शिक्षणासाठी आर्थिक सहकार्य, गरजवंतांना शैक्षणिक साहित्य वाटप, आदिवासी व दीनदलित कुटुंबांना भेट देवून सहकार्य करण्याच्या उद्देशाने तरूण क्रांती स्वाभिमान यात्रा काढण्यात आली असून ती ८ आॅगस्ट रोजी हरिव्दारकडे रवाना झाली आहे.

सदर उपक्रमाच्या माध्यमातून शेतकºयांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, व्यसनमुक्तीचा जागर, तंटामुक्ती अभियान जागृती, योग प्रचार-प्रसार, पर्यावरण संरक्षण, बेटी बचाव बेटी पढाव, स्वदेशी प्रचार-प्रसार, स्वच्छ भारत अभियान, गोमातेला राष्ट्रीय पशुचा दर्जा देण्यात यावा, शेतकºयांच्या मालाला योग्य भाव देण्यात यावा, शेतकरी आत्महत्या जनजागृती अभियान, जल है तो कल है अभियान, झाडे लावा झाडे जगवा, विदेशी वस्तुंचा बहिष्कार, शाकाहार प्रचार, रक्तदान, नेत्रदान आदिंबाबत प्रचार-प्रसार केला जाणार असल्याची माहिती यात्रा संयोजक नीलेश सोमाणी यांनी दिली.
या सामाजिक उपक्रमासाठी वाशिम अर्बन बँक, बुलडाणा अर्बन बँंकेसह विठ्ठल जोशी, सुरेश भोयर, गिरधारीलाल सारडा, राजू पाटील राजे, संजू आधारवाडे, बबनराव इंगळे, सावन राऊत आदिंनी योगदान दिले.