तात्याराव गंगावणे यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:46 AM2021-09-22T04:46:08+5:302021-09-22T04:46:08+5:30
४५ लघू प्रकल्प भरले काठोकाठ वाशिम : जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात आलेल्या दमदार पावसामुळे १३४ लघू ...
४५ लघू प्रकल्प भरले काठोकाठ
वाशिम : जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात आलेल्या दमदार पावसामुळे १३४ लघू प्रकल्पांपैकी ४५ प्रकल्प काठोकाठ भरले आहेत, तर उर्वरित प्रकल्पांपैकी ८० टक्के प्रकल्पांतही ८० टक्क्यांपर्यंत जलसाठा झाला आहे. त्यामुळे प्रकल्पांच्या सरासरी पातळीतही वाढ झाल्याचे दिसत आहे.
वाशिम शहरात पावसाची हजेरी
वाशिम : मंगळवारी दुपारी १२ वाजता शहरात पावसाचे आगमन झाले. जवळपास अर्धा तास दमदार पाऊस पडला. या पावसामुळे बाजारपेठेत मात्र ग्राहक, व्यावसायिकांची चांगलीच धावपळ झाल्याचे दिसून आले.
कीड नियंत्रणासाठी फवारणी
वाशिम : गतवर्षीप्रमाणेच यंदाही धनज बु. परिसरात संत्रा पिकाला आंबिया बहराची फळे मोठ्या प्रमाणात लागली आहेत. या फळांवर किडींचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे कीड नियंत्रणासाठी शेतकऱ्यांकडून फवारणी करण्यात येत आहे. हातचे पीक जाऊ नये याकरिता शेतकरी महागडे औषध खरेदी करीत असल्याचे दिसून येत आहे.
रस्त्यावरील पथदिवे दुरुस्तीची मागणी
वाशिम : सध्या पाऊस सुरू असून, या दिवसांत रात्रीच्या सुमारास विजेची आवश्यकता भासते. ही बाब लक्षात घेऊन खेडेगावांतील काही ठिकाणचे नादुरुस्त असलेले पथदिवे दुरुस्त करण्याची मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे. अंधारात वावरताना अनुचित प्रकार घडण्याची शक्यता आहे.